धमाकेदार आठवडा! तब्बल 5 तगडे आयपीओ येणार; पैसे कमवण्याची हीच नामी संधी

मुंबई : सध्या शेअर बाजारातील तेजी लक्षात घेता अनेक कंपन्या आपले आयपीओ(IPO) बाजारात घेऊन येत आहेत. गेल्या आठवड्यात एकूण आठ कंपन्या आपले आयपीओ घेऊन आल्या होत्या. या आठवड्यात एकूण पाच कंपन्यांचे आयपीओ येणार आहेत. त्यामुळे या आठवड्यातही आयपीओच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना चांगले पैसे कमवण्याची उत्तम संधी आहे.

या आठवड्यात एकूण पाच नवे आयपीओ (IPO)येत असले तरी यात फक्त एक आयपीओ हा मेनबोर्ड सेगमेंटचा आहे. या आयपीओचे नाव गाला प्रीसिजन इंजीनियरिंग लिमिटेड असे आहे. 2 सप्टेंबर रोजी हा आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. 4 सप्टेंबरपर्यंत या आयपीओत गुंतवणूक करता येईल. हा आयपीओ एकूण 168 कोटी रुपयांचा आहे.

यात 135.34 कोटी रुपये हे फ्रेश इश्यू आणि 32.59 कोटी रुपये ऑफर फोर सेलमध्ये असतील. या आयपीओचा किंमत पट्टा 503 ते 529 रुपये प्रति शेअर आहे. या आयपीओत गुंतवणूक करायची अशेल तर तुम्हाला एका लॉटमध्ये कमीत कमी 28 शेअर खरेदी करावे लागतील. म्हणजेच तुमच्याकडे 14,812 रुपये असणे गरजेचे आहे.

या आठवड्यात फक्त एक आयपीओ मेनबोर्ड सेगमेंटचा असेल. तर एसएमई सेगमेंटमध्ये एकूण चार कंपन्यांचे आयपीओ येणार आहेत. 2 सप्टेंबर रोजी जीयम ग्लोबल फूड्स हा आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. 4 सप्टेंबर पर्यंत या आयपीओत गुंतवणूक करता येईल. हा आयपीओ एकूण 81.94 कोटी रुपयांचा आहे.

या आयपीओचा किंमत पट्टा 59 ते 61 रुपये प्रति शेअर आहे. एसएमई सेगमेंटचा दुसरा आयपीओ नेचरविंग्स हॉलीडेज असा आहे. 3 ते 5 सप्टेंबर या काळात या आयपीओत गुंतवणूक करता येईल. हा आयपीओ 7.03 कोटी रुपये आहे. या आयपीओचा किंमत पट्टा 74 रुपये आहे.

4 सप्टेंबर रोजी एकूण दोन आयपीओ येणार आहेत. हे आयपीओ गुंतवणुकीसाठी 6 सप्टेंबरपर्यंत या आयपीओत गुंतवणूक करता येईल. यातील पहिल्या आयपीओचे नाव हे नमो इन्व्हेस्ट मॅनेजमेंट असून तो 51.20 कोटी रुपयांचा आहे. या आयपीओचा किंमत पट्टा 80 ते 85 रुपये आहे. मॅक कॉन्फ्रेंसेज अँड इव्हेंट्स लिमिटेड हा आयपीओ 125.28 कोटी रुपयांचा आहे. या आयपीओचा किंमत पट्टा 214 ते 225 रुपये आहे.

(टीप– शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

हेही वाचा:

‘मी कपडे बदलताना…’; अभिनेत्रीच्या गंभीर आरोपानं खळबळ

तिकीट नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्षांनी थेट राजीनामाच दिला

ताराराणी पक्ष विधानसभेच्या सहा जागा लढवणार! इचलकरंजी, हातकणंगले, शिरोळमध्ये….