सर्वसामान्यांना झटका! खाद्य तेलाच्या दरात झाली मोठी वाढ

आज आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सर्वसामान्यांना झटका देणारी बातमी समोर आली आहे. सरकारने कच्च्या तेलावरील(oil) आयात शुल्क 10 टक्क्यांनी वाढवलं आहे. मात्र, या घोषणेनंतर राज्यभरात खाद्य तेलाच्या किंमतीमध्ये मोठी वाढ झाल्याचं दिसून आलं. खाद्य तेलाच्या दरात प्रति किलो 20 ते 25 रुपयांची वाढ झाल्याचं समोर आलं. यामुळे ऐन सणा-सुदीच्या काळात सामान्य जनतेला मोठा झटका बसला आहे.

सरकारने कालच सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा दिला. सरकारने आयात करण्यात येणाऱ्या कच्या तेलावर(oil) आयात शुल्क हे 10 टक्क्यांनी वाढवलं. मात्र, ही घोषणा होताच दुसरीकडे खाद्य तेलाच्या किंमती वाढल्या. यामुळे सामान्य जनतेचे बजेटही आता कोलमडणार आहे.

कोणत्या तेलाचे दर वाढले?
सोयाबीन – पहिले दर 110 तर आताचे दर 130 रुपये आहेत.
शेंगदाना – पहिले दर 175 तर आताचे दर 185 रुपये आहेत.
सूर्यफुल – पहिले दर 115 तर आताचे दर 130 रुपये आहेत.

सोयाबीन दरवाढीसाठी तेलाच्या आयात शुल्कात वाढ करण्याची मागणी करण्यात आली होती.सरकारने ही मागणी मान्य करत याबाबत मोठी घोषणा केली. केंद्र सरकारकडून कच्चे सोयाबीन,पाम तेल, सूर्यफूल तेलावरील आयात शुल्कात 20 टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली.

तसेच रिफाइंड सूर्यफूल, सोयाबीन तेलावरील आयात शुल्क 13.75 टक्क्यांवरुन वरून 35.75 टक्के करण्यात आली आहे. शेतकऱ्यांकडून सोयाबीन दरवाढीसाठी तेलावरील आयात शुल्कात 20 ते 30 टक्के वाढ करावी, अशी मागणी करण्यात आली होती. याचबरोबर सरकारने कांदा, बासमती तांदळावरील निर्यातमूल्य देखील हटवले आहे. मात्र, या निर्णयानंतर लगेच खाद्य तेलाच्या दरात मोठी वाढ झाल्याचं दिसून आलं.

हेही वाचा:

आनंद आश्रमात पैसे उधळले ! शाखाप्रमुखांची हकालपट्टी; मुख्यमंत्री शिंदेंची मोठी कारवाई

शरद पवार गटाचं महाविकास आघाडीतील स्थान; जितेंद्र आव्हाड म्हणाले…

लवकरच जुळून येतोय अतिशय शुभ योग; अनेक मार्गातून येणार पैसा, प्रत्येक क्षेत्रात मिळेल यश