नियंत्रण सुटले अन् 18 प्रवाशांची बस थेट अलकनंदा नदीत कोसळली..; रुद्रप्रयागमध्ये अपघातांची मालिका

देशामध्ये सध्या अपघातांची मालिका सुरु झाली आहे. अहमदाबाद विमान अपघात तसेच केदारनाथ हेलिकॉप्टर कोसळल्याची दुर्घटना झाली होती. यानंतर आता उत्तराखंडमधील अलकनंदा नदीमध्ये बस (bus)कोसळल्याने अपघात झाला आहे. रुद्रप्रयागमध्ये झालेल्या या अपघातामध्ये प्रवाशांनी भरलेली बस नदीमध्ये कोसळली. या अपघातग्रस्त बसमध्ये 18 प्रवासी प्रवास करत होते. यामधील सात प्रवाशांना वाचवण्यात यश आले आहे. घटनास्थळी बचाव पथक आणि पोलीस प्रशासन दाखल झाले आहे.

अलकनंदा नदीमध्ये बस(bus)कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. यामध्ये 18 प्रवासी प्रवास करत होते. त्यापैकी सात प्रवाशांना वाचवण्यात यश आले आहे. तर इतर 11 प्रवासी हे बेपत्ता झाले आहेत. त्यांचे शोधकार्य युद्धपातळीवर सुरु आहे. दुर्घटनेच्या ठिकाणी बचाव पथक, स्थानिक पोलीस, एसडीआरएफचे पथक दाखल झाले आहे. यापूर्वी देखील केदारनाथ आणि रुद्रप्रयागमध्ये अपघात झाला आहे. सध्या या भागातील वातावरणामध्ये बदल झाला आहे. पावसाचे प्रमाण वाढल्यामुळे उत्तराखंडमध्ये गाडी आणि हेलिकॉप्टरचे अपघात होत आहेत. नदी नाल्यांना देखील पाणी वाढले आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, 18 प्रवाशांना घेऊन ही अपघातग्रस्त बस ब्रदीनाथला चालली होती. त्यावेळी चालकाचं बसवरचं नियंत्रण सुटलं. ही बस नदीत कोसळली. स्थानिकांना ही बाब कळल्यानंतर त्यांनी याबाबतची माहिती पोलिसांना कळवली. पोलीस आणि एसडीआरएफचं पथक या ठिकाणी आलं. UK 08, PA 7444 या बसचा अपघात झाला आहे. या बसमध्ये चालकाहह एकूण २० जण बसलेले होते.

या बसमध्ये(bus) उदयपूर (राजस्थान) आणि गुजरात येथील सोनी परिवार चारधाम यात्रेसाठी आले होते. याच बसचा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये एका प्रवाशाचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची माहिती देखील समोर येत आहे. बस अपघात स्थळापासून ४० किमी अंतरावर असलेल्या गढवालमधील श्रीनगर येथील धरणाजवळ एसडीआरएफचे जवान शोध मोहीम राबवत असून नदीच्या जोरदार प्रवाहामुळे बसमधील प्रवासी पुढे वाहून आले का याची तपासणी केली जात आहे.

विभागीय आयुक्तांनी या रुद्रप्रयागमधील अपघाताबद्दल माहिती दिली आहे. त्यांनी सांगितली की, “प्रवाशांना घेऊन बस चालली होती. ही बस अलकनंदा नदीत कोसळली आणि अपघात झाला. रुद्रप्रयाग जिल्ह्यातील ही घटना आहे. घटनेची माहिती मिळताच या ठिकाणी मदत आणि बचाव कार्य सुरु झालं आहे. एका व्यक्तीचा या घटनेत मृत्यू झाला आहे.

विभागीय आयुक्त विनय शंकर पांडे यांनी माहिती दिली आहे की या घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. सात जण जखमी झाले आहेत आणि त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. इतर बेपत्ता प्रवाशांचा शोध पोलीस आणि एसडीआरएफकडून घेतला जातो आहे. पोलीसांच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार बस अनियंत्रित झाल्याने हा अपघात झाला. १८ प्रवाशांना घेऊन जाणारी बस अलकनंदा नदीत कोसळली. या घटनेत जे प्रवासी बेपत्ता आहेत त्यांचा शोध आम्ही घेत आहोत,” अशी माहिती विभागीय आयुक्तांनी दिली आहे.

हेही वाचा :

ठाकरे गटाचे फायर ब्रँड भास्कर जाधवांची घुसमट

कुत्रा चिरडल्याच्या रागातून रुग्णवाहिकेला अडवून चालकाला मारहाण; विलंबामुळे रुग्णाचा मृत्यू

या 4 जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा अलर्ट, समुद्राला मोठी भरती, 4.75 मीटर उंचीच्या लाटा उसळणार