एका कुत्र्याने रोखलं विमानाचं लँडिंग… नेमकं काय घडलं?

एअर इंडिया कंपनीच्या मागे लागलेलं शुक्लकाष्ट काही संपतच नसल्याचं चित्र दिसत आहे.(landing) काही दिवसांपूर्वी दिल्लीहून आलेल्या विमानाला पक्षी धडकला आणि त्या विमानाचे उड्डाण रद्द करण्यात आलं होतं. ही घटना ताजी असतानाच आता पुणे विमानतळावर एक भयानक प्रकार घडला आहे. भुवनेश्वरहून पुण्याला आलेल्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिगचं करता आलं नाही आणि तब्बल 57 मिनिटं म्हणजे सुमारे तासभर हे विमान हवेतच घिरट्या घालतं होतं. ते विमान लँड करू न शकल्याचं कारणंही तितकंच धक्कादायक आहे, ते म्हणजे धावपटट्टीवर आलेला एक कुत्रा…

विशेष म्हणजे असा हाँ पहिलाच प्रकार नसून अशा घटना अनेकवेळा घडत असल्याने प्रवाशांची सुरक्षा ही भगवान भरोसे असल्याचे बोलले जात आहे. मात्र या प्रकरामुळे प्रवाशांमध्ये चांगलीच घबराट निर्माण झाली होती.मिळालेल्या माहितीनुसार, भुवनेश्वर येथून पुण्याला येणारे एअर इंडियाचे विमान आय एक्स 1097 हे पुणे विमानतळाच्या धावपट्टीवर उतरण्याच्या प्रक्रियेत होते, मात्र त्याला लँडिंगच करता आलं नाही. (landing) कारण हे विमान सुमारे 100 ते 150 फूट उंचीवर असताना वैमानिकाला धावपट्टीवर कुत्रा आढळून आला. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी वैमानिकाने त्या धावपट्टीवर लँडिंग न करण्याचा निर्णय घेतला आणि पुन्हा विमान हवेत झेपावलं. कारण हे विमान आणखी काही फूट खाली आले असते तर मात्र वैमानिकाला पुन्हा विमानाला वर नेणं खूप अवघड झालं असते. त्यामुळे एअर इंडियाचं हे विमान तब्बल 57 मिनिटं हवेतच घिरट्या घालतं होतं. वैमानिकाने सुमारे दीडशे फूट उंचीवर असताना लँडिंग थांबवलं होतं.

धावपट्टीवर कुत्रा असल्याची बाब निदर्शनास आल्यानंतर तेथील संबंधित अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी धावपट्टीवर धाव घेतली आणि त्या कुत्र्यालाा तेथून लगेच हिसकावून लावले. अखेर कुत्रा तेथून गेल्यानंतर धावपट्टी लँडिंगसाठी क्लिअर झाली आणि मग त्यानंतरच वैमानिकाने सुरक्षितरित्या विमानाचे लँडिंग केलं. (landing) मात्र यामुळे विमानाला सुमारे एक तास उशीर झाला. शनिवारी सायंकाळी सहाच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली असून खाली सुखरुप उतरेपर्यंत सर्व प्रवाशांचा जीव तर टांगणीलाच लागलेला होता.

काही दिवसांपूर्वीच अहमदाबाद येथे ‘एअर इंडिया’च्या विमानाचता भीषण अपघात झाला, ज्यात 241 प्रवाशानी जीव गमावला तर ते विमान जिथे कोसळलं त्या परिसरातील अनेक नागरिकही मृत्यूमुखी पडले, मृतांची एकूण संख्या 275 च्या पुढे पोहोचली होती. त्या दुर्दैवी घटनेला अजून महिनाही पूर्ण झालेला नाही, मात्र त्यातच आता पुण्यात घडलेली ही घटना हवाई सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर धोक्याचा इशारा देणारी मानली जात असून प्रवाशानी नाराजी व्यक्त केली आहे. अशा गंभीर घटनांची दखल घेऊन त्यावर तातडीने आणि शिस्तबद्ध उपाययोजना न झाल्यास एखादी मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे, नागरी उड्डाण मंत्रालय आणि हवाई दलाने या बाबतीत तत्काळ पावले उचलावीत, अशी मागणी केली जात आहे.

हेही वाचा :

उबाठा सेनेत बेरजेचे नव्हे तर वजाबाकीचे राजकारण

सावधान! घरात मांजर पाळताय? संशोधनातून धक्कादायक माहिती उघड

चॉकलेटसाठी हट्ट केल्यावर जन्मदात्याने चार वर्षीय लेकीला संपवलं; पळून जात असतांना अटक…..