चाल शेकी-शेकी गाण्यावर चिमुकलीने केला झकास डान्स;गोड एक्सप्रेशन्सनी जिंकलं सर्वांचं मन

सध्या सोशल मीडियावर एका चिमुकल्या मुलीचा डान्स व्हिडिओ तुफान (media)व्हायरल होत आहे. चाल शेकी-शेकी या प्रसिद्ध मराठी गाण्यावर केलेल्या तिच्या नृत्याने नेटिझन्सचं लक्ष वेधून घेतलं आहे. तिचे स्टेप्स, गोड हावभाव आणि निरागस चेहरा पाहून अनेकांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. सोशल मीडियावर अशा प्रकारचे डान्स व्हिडिओज सतत ट्रेंडमध्ये असतात, पण या सात वर्षांच्या मुलीने जे सादर केलं आहे, ते खरंच विशेष ठरतं आहे.

कशामुळे व्हिडिओ झाला व्हायरल?
या व्हायरल व्हिडिओमध्ये ही चिमुकली सुंदर अशा पोशाखात आहे. त्यानंतर ती या धम्माल मराठी गाण्यावर उत्साहाने आणि अतिशय आत्मविश्वासाने नाचते. डान्स करताना तिचे एक्सप्रेशन्स अगदी (media)व्यावसायिक डान्सरप्रमाणे आहेत. या लहानशा वयात एवढं सुंदर सादरीकरण पाहून नेटकऱ्यांचं लक्ष तिच्यावर खिळून राहिलं

या व्हिडिओला लाखोंच्या घरात व्ह्यूज मिळाले असून हजारोंनी ते शेअर केलं आहे. इंस्टाग्राम, फेसबुक, यूट्यूब अशा विविध प्लॅटफॉर्मवर हा डान्स चर्चेचा विषय ठरत आहे. मात्र, हा व्हिडिओ सध्या (media)यूट्युबवरील एका अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे. सोशल मीडियावर वारंवार अनेक डान्सचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. मात्र हा डान्स व्हिडिओ अनेकांच्या मोठ्या पसंतील आलेला आहे.

व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक युजर्सनी कमेंट्समध्ये लिहिलं आहे की, ”या लहानशा वयात इतकं टॅलेंट कुठून येतं?” तसेच,”हिला जर योग्य मार्गदर्शन मिळालं, तर भविष्यात मोठी नृत्यांगना होईल” अशा अनेक प्रतिक्रियाही उमटत आहेत. काही जणांनी तर या चिमुकलीला ‘लिटल क्वीन ऑफ एक्सप्रेशन्स’ असे टायटलसुद्धा दिलं आहे.

हेही वाचा :

व्हायरल इन्फेक्शन की फुफ्फुसांचा त्रास? ताप गेला तरी खोकला का राहतो?

आजच्या धावपळीच्या, तणावपूर्ण जीवनशैलीमुळे अनेक महिलांना मानसिक ताण, झोप न येण्याच्या तक्रारी

इंग्लंडला विजयानंतर मिळाली अजून एक गुड न्यूज, सामना संपल्यावर नेमकं घडलं तरी काय, जाणून घ्या..