लिव्हरच्या कार्यात अडथळे निर्माण झाल्यानंतर शरीराला हानी पोहचते.(integration) त्यामुळे लिव्हर डिटॉक्स करणे आवश्यक आहे. लिव्हर डिटॉक्स करण्यासाठी आहारात हळद आणि लसूण खावी. यामुळे लिव्हरमध्ये साचलेले विषारी घटक बाहेर पडून जातात.

दारूमुळे सडलेले लिव्हर आतून होईल चकाचक स्वच्छ!
दारूमुळे सडलेले लिव्हर आतून होईल चकाचक स्वच्छ!
शरीरातील सगळ्यात महत्वाचा अवयव म्हणजे लिव्हर.(integration) शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्याचे काम लिव्हर करते. बॉडी डिटॉक्स केल्यामुळे शरीरात साचून राहिलेले विषारी घटक, अनावश्यक पेशी बाहेर पडून जातात.शरीर कायम निरोगी राहण्यासाठी लिव्हर निरोगी असणे आवश्यक आहे. पण हल्लीच्या बदलेल्या जीवनशैलीचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. अपुरी झोप, आहारात सतत होणारे बदल आणि सतत दारूचे सेवन केल्यामुळे लिव्हर आतून खराब होऊन जाते. फॅटी लिव्हर किंवा लिव्हर सोरायसिस सारखे गंभीर आजार होण्याची जास्त शक्यता असते. फॅटी लिव्हरची समस्या उद्भवू लागल्यानंतर लिव्हरमध्ये अनावश्यक पेशी जमा होतात. यामुळे लिव्हरच्या कार्यात अडथळे निर्माण होण्याची जास्त शक्यता असते.
कोरोनाची लस देते मृत्यूला आमंत्रण? ICMR आणि AIIMS च्या अहवालात मोठा खुलासा…
लिव्हरच्या कार्यात अडथळे निर्माण झाल्यानंतर लिव्हरमध्ये(integration) विषारी घटक तसेच साचून राहतात. या विषारी घटकांमुळे आरोग्याला हानी पोहचण्याची जास्त शक्यता असते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला फॅटी लिव्हर किंवा दारूमुळे खराब झालेले लिव्हर स्वच्छ करण्यासाठी कोणत्या पदार्थांचे सेवन करावे? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या पदार्थांचे नियमित सेवन केल्यास लिव्हरमध्ये साचलेली घाण बाहेर पडून जाईल आणि शरीर डिटॉक्स होण्यास मदत होईल.
लिव्हर स्वच्छ करण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचे सेवन:
हळद:
रोजच्या वापरात हळदीचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. हळद आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे. यामध्ये असलेले क्यूमिन शरीरातील विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी मदत करते. हळदीचा वापर जेवणातील सर्वच पदार्थ बनवताना केला जातो. यामुळे पदार्थाची चव वाढते. यासोबतच सुगंध वाढण्यास मदत होते. हळदीमध्ये असलेले अॅंटी-इन्फ्लामेटरी आणि अॅंटी-ऑक्सिडेंट गुणधर्म लिव्हरला आतून आलेली सूज कमी करण्यासाठी मदत करते. यासाठी एक ग्लास कोमट पाण्यात हळद, तूप टाकून नियमित प्यायल्यास शरीरात साचलेले विषारी घटक बाहेर पडून जातील आणि लिव्हर स्वच्छ होईल.
लसूण:
लसूण खाणे आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे. रोजच्या आहारात नियमित लसुणचा वापर करावा. जेवणात फोडणी देण्यासाठी लसूण वापरला जातो. लसूणमध्ये असलेले एलिसिन लिव्हर डिटॉक्स करते. याशिवाय लिव्हरमधील एंझाइम्स सक्रिय करते. लसूण खाल्यामुळे लिव्हरमध्ये साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातात. लिव्हर स्वच्छ करण्यासाठी सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी लसूण चावून खाल्ल्यास लिव्हरसोबत संपूर्ण शरीर स्वच्छ होईल. यामुळे तुमच्या शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढेल.
FAQs (संबंधित प्रश्न)
यकृत डिटॉक्स किती दिवसांसाठी करावे?
यकृत डिटॉक्सची प्रक्रिया काही दिवसांपासून काही आठवड्यांपर्यंत असू शकते.
यकृत डिटॉक्ससाठी कोणते डॉक्टर किंवा तज्ञ सल्लागार आहेत?
तुम्ही गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट किंवा हेपॅटोलॉजिस्ट यांच्याशी संपर्क साधू शकता. ते तुम्हाला यकृताच्या आरोग्यासाठी योग्य मार्गदर्शन करू शकतात.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
हेही वाचा :
एसटी महामंडळाने कर्मचाऱ्यांसाठी घेतला सर्वात मोठा निर्णय!
‘आवाज मराठीचा’: 19 वर्षांनंतर ठाकरे बंधू पुन्हा एकत्र; राज्याचं लक्ष ५ जुलैच्या ऐतिहासिक सभेकडे
‘बाहेर पडू नका…’ टीम इंडिया राहत असलेल्या हॉटेलबाहेर संशयास्पद वस्तू सापडल्याने खळबळ