भारताचं पहिलं रियुजेबल हायब्रिड रॉकेट RHUMI-1 यशस्वीपणे लाँच करण्यात आले आहे. अंतराळ क्षेत्रात भारताने आणखी एक मोठी कामगिरी केली आहे. लाँचिंगसाठी मोबाइल लाँचरचा वापर करण्यात आला आहे. म्हणजेच रॉकेटला कुठूनही लाँच करता येऊ शकते. स्पेस झोन इंडिया आणि मार्टिन ग्रुप यांनी मिळून रॉकेट तयार केले आहे.
या रॉकेटमध्ये तीन क्यूब सॅटेलाइट्स आणि 50 PICO सॅटेलाइट्स लाँच करण्यात आले आहेत. सब ऑर्बिटल मध्ये प्रक्षेपित करण्यात आले आहे. हे सॅटेलाइट्स ग्लोबल वॉर्मिंग आणि जलावायू परिवर्तनाचा अभ्यास करून त्याची माहिती पाठवणार आहेत. रूमी 1 रॉकेटमध्ये जेनेरिक फ्यूल आधारित हायब्रीड मोटार आणि इलेक्ट्रिकली ट्रिगर्ड पॅराशूट डेप्लॉयर आहेत.
हेही वाचा:
विकासापासून खूप खूप दूर राजर्षी शाहूंचं कोल्हापूर…!
भारतीयांना धक्का! दिग्गज क्रिकेटरची तडकाफडकी निवृत्ती
आज श्रावणी शनिवार, महादेवाच्या कृपेने ‘या’ राशींचं भाग्य उजळणार!