पतंग पकडण्यासाठी तरुण भर रस्त्यात ट्रकवर चढला अन्…; Video Viral

सोशल मीडियावर(social media) दर सेकंदाला काही ना काही व्हायरल होत असते. कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ.

सध्या नवीन वर्षाला सुरुवात झाली असून दोन दिवसांपूर्वीच मकर संक्रांतीचा सण संपूर्ण देशभरात साजरा करण्यात आला. यानिमित्त अनेकांनी पतंग उडवल्या. याचे व्हिडिओ सध्या (social media)सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. संक्रातीचा उत्साह या व्हिडिओंमधून दिसून येतो. प्रत्येकजण घराच्या छतावर जाऊ आनंदाने पंतग उडवतानाचा उत्याह पाहायला मिळतो.

दरम्यान एक वेगळाच व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ पुण्यातील असल्याचे म्हटले जात आहे. या व्हिडिओने सर्वांचे लक्ष वेधले असून हा व्हिडिओ संक्रांतीनंतरचा आहे.

व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एका तरुणाने पतंग पकडण्यासाठी केलेला भन्नाट प्रताप पाहून अनेकांनी पोट धरून हसण्याचा आनंद लुटला. मात्र, त्याने जे केले आहे त्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एक युवक भर रस्त्यात गाड्यांच्या गदारोळात एका मोठ्या ट्रकवर चढलेला दिसत आहे. झाडावर अडकलेली पतंग पकडण्यासाठी त्याने हा धाडसी पण मजेशीर प्रकार केला. ट्रकवर चढल्याने वाहतूक थांबली आणि मागे गाड्यांची रांग लागली, पण तरीही त्याने पतंग सोडली नाही. अखेर झाडावरील पतंग पकडून तो ट्रकवरून उतरला. हा प्रसंग पाहणाऱ्या लोकांना हसू अनावर झाले.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @heypuneofficial या अकाउंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “पतंग पकडण्यासाठी पुण्यातील युवक ट्रॅफिकमधील ट्रकवर चढला” काही वेळातच या व्हिडीओला 50 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. सध्या या व्हिडिओची सोशल मीडियावर तुफान चर्चा सुरू आहे.

अनेक युजर्सनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, “पतंगाच्या मांज्याने कोणाचा गळा कापू नये म्हणून चढला” तर, दुसऱ्याने “पुणेकर ऑन टॉप” म्हणत त्याचा गौरव केला आहे. या व्हिडीओने संक्रांतीच्या आनंदसोहळ्याला एक हास्याची फोडणी दिली, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

हेही वाचा :

फेसबुकवर मैत्री; वारंवार अत्याचार अन् लग्न, मग सुरु झाला खेळ अन्…

आठवा वेतन आयोग मंजूर: किती कर्मचाऱ्यांचा पगार आणि पेन्शन वाढणार?

विराट कोहलीने चाहत्यांना फटकारले, डोळ्यात दिसला राग, म्हणाला – माझा रस्ता अडवू नका…