सांगलीत बैलगाडाचे चाक अंगावरून गेल्याने तरुणाचा मृत्यू

सांगली : परंपरेनुसार पिरांच्या उरूस दरम्यान बैलगाडा(wheel) पळविण्याचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमात बैल बिथरले. ते थेट गर्दीत गेल्यामुळे नागरिकांची पळापळ सुरु झाली. यात एक तरुण खाली पडला असता अंगावरून चाक गेल्याने तरुणाचा मृत्यू झाला. सदरची घटना सांगलीच्या खानापूर तालुक्यातील वाळूजमध्ये आज दुपारच्या सुमारास घडली.

सांगलीच्या खानापूर तालुक्यातील वाळूजमध्ये उरूसाचा(wheel) कार्यक्रम होता. या कार्यक्रमादरम्यान बैलगाडा पळवण्याच्या कार्यक्रमादरम्यान बैलगाडाच्या चाकाखाली आल्याने रोहन राजेंद्र घोरपडे (वय २३) या तरुणाचा मृत्यू झाला. वाळूज गावात पिराचा उरूस सुरु असून खडी येथे बैलगाडा पळवण्याची अनेक वर्षांपासूनची परंपरा आहे.

या परंपरेंनुसार बैलगाडा पळवण्याचा कार्यक्रम सुरू झाला. मात्र यातील एक बैलगाडा पळत असताना बैलगाडा थेट बघणाऱ्या माणसांच्या गर्दीत घुसला. या धावपळीत रोहन घोरपडे पळत असताना तो पाय घसरून पडला आणि त्याच्या अंगावरून बैलगाड्याचे चाक गेले.

उरूसासाठी बनवण्यात आलेल्या या बैलगाड्याचे चाक मोठे आणि वजनदार असते. हे चाक अंगावरून गेल्याने रोहन गंभीर जखमी झाला. यानंतर रोहनला तातडीने विट्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र दवाखान्यात पोहचण्यापूर्वीच रोहन याचा रस्त्यात मृत्यू झाला.

हेही वाचा :

रेल्वे प्रोटेक्शन फोर्समध्ये उपनिरीक्षक आणि कॉन्स्टेबलसाठी भरती; असा करा अर्ज

 ‘मुस्लिम मते हवीत पण उमेदवार नको’, प्रकाश आंबेडकरांचा ‘मविआ’वर निशाणा

जिओ सिनेमावर मोफत आयपीएल दाखवून मुकेश अंबानींनी केली 4000 कोटींची कमाई