कोब्रासोबत स्टंट करायला गेला अन् जीव गमावून बसला, तरुणाचा VIDEO व्हायरल

गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा तालुक्यातील घोगरा येथे धक्कादायक घटना घडली आहे.(stunt)स्टंटबाजी करणाऱ्या ३० वर्षीय तरुणाला जीव गमवावा लागला आहे. शेजाऱ्यांच्या घरात साप आढळल्याने कोणतेही प्रशिक्षण नसताना साप पकडायला गेलेल्या तरुणाला कोब्रा सापाने दंश केला आहे. या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. लक्की बागडे असे मृतक तरुणाचे नाव आहे.

गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील घोगरा या गावात कुंभरे यांच्या घरी साप आढळून आला. ही माहिती मिळताच गावकऱ्यांनी कुंभरे यांच्या घरी गर्दी केली. (stunt)गावातील लक्की बागडे या तरुणाला साप पकडण्याचे कोणतेही प्रशिक्षण नसताना स्टंट बाजी करत लक्कीने सापाला पकडण्याचे धाडस केले. साप पकडण्यास गेला असता लक्कीला कोब्रा सापाने दंश केला.

दरम्यान साप चावल्याने त्याला तातडीने भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथील उपजिल्हा रुग्णांमध्ये दाखल करण्यात आले. तिथे त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. (stunt)मात्र, प्रकृती गंभीर असल्याने त्याला जिल्हा रुग्णालय भंडारा येथे नेण्यात आले याच दरम्यान त्याचा मृत्यू झाला असल्याचं डॉक्टरांनी सांगितले.या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अशाप्रकारचे साप घरी आढळल्यास वन्यजीव सुरक्षकांना कळवा.

हेही वाचा :

YouTube वर पैसे कमवणे आता अवघड! नियम बदलले, वाचा सविस्तर

घरात कडाक्याच भांडण झालं, नवऱ्याने रागारागात चौथ्या मजल्यावरुन उडी मारली; जागीच मृत्यू VIDEO VIRAL

शिवसेना पक्ष आणि चिन्हावर ‘या’ तारखेला सुप्रीम कोर्टात सुनावणी; महाराष्ट्राचे लक्ष या निर्णयाकडे