ऐश्वर्यासोबतच्या घटस्फोटावर अभिषेक बच्चनचं थेट उत्तर; म्हणाला, ‘मी पुन्हा लग्न करतोय…’

बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेत राहिलेलं कपल म्हणजे अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन. गेल्या काही महिन्यांपासून या दोघांच्या घटस्फोटाच्या(divorce) चर्चा सोशल मीडियावर प्रचंड गाजत आहेत. एकत्र फारसे न दिसणं, कार्यक्रमांमध्येही दोघांमध्ये अंतर दिसणं, अशा अनेक गोष्टींमुळे चर्चांना खतपाणी मिळालं.

अभिषेक आणि ऐश्वर्या यांचं नातं 2006 मध्ये ‘उमराव जान’ आणि ‘धूम 2’च्या चित्रीकरणादरम्यान फुललं. 2007 मध्ये दोघांनी एकमेकांशी लग्न केलं आणि तेव्हापासून ते बॉलिवूडचं ‘पॉवर कपल’ म्हणून ओळखले जातात. मात्र गेल्या काही काळात दोघांमधील दुरावा स्पष्टपणे दिसू लागल्याने घटस्फोटाच्या(divorce) अफवा उफाळून आल्या.

अभिषेक बच्चननं अखेर तोडलं मौन :
सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चांना उत्तर देताना अभिषेक बच्चननं आपल्या खास विनोदी अंदाजात ट्वीट केलं. तो म्हणाला, “ठीक आहे… तर मी घटस्फोट घेतोय. मला याची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद! आता तुम्ही सांगाल का, मी दुसरं लग्न कधी करतोय?

अभिषेकचं हे उत्तर ऐकून अनेकांनी हसू दाबू शकले नाहीत. काहींनी यामागचा त्याचा कॉमिक अंदाज ओळखून कौतुक केलं, तर काहींनी मात्र अशा अफवा पसरवणाऱ्यांना खरं खोचक प्रत्युत्तर दिल्याबद्दल त्याची पाठराखण केली.

“माझं कुटुंब आहे, अशा अफवांचा परिणाम होतो” – अभिषेकचा स्पष्ट इशारा :
यासंदर्भात अभिषेकनं स्पष्ट सांगितलं की, अशा अफवा फक्त व्यक्तीपुरत्या मर्यादित राहत नाहीत, तर संपूर्ण कुटुंबावर परिणाम करतात. “हे सर्व फार त्रासदायक आहे. लोकं काहीही बोलतात, पण त्याचा परिणाम माझ्या कुटुंबावर होतो. माझं वैयक्तिक आयुष्य आहे आणि ते मी जगतो, तुम्ही नाही,” असं तो म्हणाला. अशा अफवांमुळे सेलिब्रिटींच्या आयुष्यावर आणि त्यांच्या कुटुंबीयांवर काय परिणाम होतो, हे त्याच्या या विधानातून स्पष्ट होतं.

हेही वाचा :

पुढील ४ दिवस ‘या’ भागात मुसळधार पाऊस कोसळणार

भारतीय हवाई दलात नोकरीची मोठी संधी! कसा कराल अर्ज? काय आहे पात्रता? 

भारतातील ‘या’ राज्यावर 6 जुलैला विनाशकारी संकट? नागरिकांकडे वाचण्यासाठी फक्त 2 दिवसांचा वेळ!