सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये थिएटरमध्ये एका महिलेने अभिनेत्याला थप्पड मारली आहे. ही घटना तेलुगू अभिनेत्यासोबत घडली आहे. या अभिनेत्याचे नाव एनटी रामास्वामी आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान एका महिलेने अभिनेत्यावर(actor) हल्ला केला आहे. खलनायकाच्या भूमिकेतील अभिनेत्याने चित्रपटातील जोडप्याचा छळ का केला, याचा त्या महिलेला राग आला होता.
थिएटरमध्ये चित्रपट सुरु असताना ती अभिनेत्यावर(actor) प्रचंड रागावली. तिने थेट अभिनेत्यावर हल्ला केला. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
एनटी रामास्वामीसोबत घडलेली घटना ही गुरुवारी घडली आहे. जेव्हा ‘Love Reddy’ हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट पाहण्यासाठी या चित्रपटाची संपूर्ण टीम थिएटरमध्ये पोहोचली होती. या चित्रपटात खलनायकची भूमिका साकारणारा अभिनेता एनटी रामास्वामी देखील थिएटरमध्ये उपस्थित होता. चित्रपटाच्या शेवटी सर्वांचे आभार व्यक्त करण्यासाठी या चित्रपटाची संपूर्ण टीम एकत्र उभी राहिली. त्यानंतर एक महिला अभिनेत्याजवळ आली आणि बाचाबाची करु लागली.
एनटी रामास्वामी आपल्या सह कलाकारांसोबत उभे असताना अचानक एका महिलेने त्यांची कॉलर पकडली आणि अभिनेत्याला थप्पड मारली. ती अभिनेत्याला मारत राहिली. शेजारी उभे असलेले लोक तिला मागे आढत होते. कारण त्या महिलेला चित्रपटातील खलनायकाची भूमिका पाहून राग आला होता. तिने अभिनेत्याला विचारले की तुम्ही या जोडप्याला का त्रास दिला?
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, कशा प्रकारे ती महिला संतप्त झाली होती आणि ती कशी अभिनेत्याकडे धावत गेली आणि अभिनेत्याची कॉलर पकडून त्याला थप्पड मारली. ती जोरात ओरडून त्या अभिनेत्याला विचार होती. तुम्ही जोडप्याला का त्रास दिला? या घटनेनंतर अभिनेत्याला धक्का बसल्याचं व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे.
हेही वाचा :
आजचे राशी भविष्य (26-10-2024) : astrology
‘या’ पद्धतीने पाणी प्यायल्यास कमी वयात शरीरात जाणवतो सांधेदुखी
इचलकरंजीत भाजपा युवा मोर्चाचा “विकसित महाराष्ट्र अभियान” अंतर्गत भव्य बाईक रॅली आणि संवाद कार्यक्रम