लोकसभा निवडणूक मतदानासाठी मुंबई(private offices) उपनगर जिल्ह्यातील उद्योग समूह, महामंडळे, कंपन्या व संस्था, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापनांवरील कर्मचाऱ्यांना भरपगारी सुटी अथवा सवलत न दिल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यास संबधित आस्थापनांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी दिली.
मुंबई उपनगर जिल्ह्यात समाविष्ट लोकसभा(private offices) मतदारसंघात २० मे रोजी मतदान होणार आहे.या भागात मतदार असलेले मात्र ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही, त्या सर्व चाकरमान्यांना मतदान करता यावे यासाठी भरपगारी सुटी अथवा दोन तासांची सवलत देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
ज्या आस्थापनांना पूर्ण दिवस सुटी देणे शक्य नसेल अशा आस्थापनांनी दोन तासांची सवलत मतदारांना द्यावी मात्र त्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांची परवानगी घेणे आवश्यक राहील.मुंबई उपनगर जिल्ह्यात मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी हे परिपत्रक काढण्यात आले आहे.
हेही वाचा :
इलॉन मस्क पुन्हा गोत्यात! कोर्टाचे आदेश मानण्यास नकार
मोदींच्या मनासारखं झालं नाही तर ते सत्तेचा गैरवापर करतात; शरद पवारांची टीका
किती हा अहंकार.. रणबीर पापाराझींवर भडकताच नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा वर्षाव