विशाल पाटील यांना उमेदवारी न मिळाल्याने सांगलीत कार्यकर्ते आक्रमक

सांगली लोकसभा मतदार संघातून विशाल पाटील यांना लोकसभेची उमेदवारी(nomination) न मिळाल्याने काँग्रेसचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहे. आक्रमक झालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिरज काँग्रेस कमिटी बरखास्त करण्याचा ठराव केला. त्यानंतर सांगलीमध्ये देखील काँग्रेस कार्यकर्त्यांनी आक्रमक होत सांगलीतील काँग्रेस भवनच्या इमारतीवरील काँग्रेस शब्द पुसून टाकला.

मिळालेल्या माहितीनुसार, विशाल पाटील यांना काँग्रेसकडून(nomination) उमेदवारी न मिळाल्याने काँग्रेसचे कार्यकर्त्यांनी पुन्हा आक्रमक भूमिका घेतली आहे. सांगलीतील काँग्रेस भवनच्या इमारतीवरील काँग्रेस या शब्दाला रंह लावत काँग्रेस शब्द कार्यकर्त्यांनी पुसून टाकला. सांगली जिल्हा काँग्रेस कमिटी असं काँग्रेस भवनच्या इमारतीवर उल्लेख होता. संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमका घेत काँग्रेस शब्द पुसून टाकला.

सांगलीत काँग्रेस कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालयावरील काँग्रेस नाव पुसण्याआधी मिरजमधील काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले. मिरज तालुका काँग्रेस कमिटी आजपासून बरखास्त करण्याचा ठराव काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला आहे. सांगलीमधील विशाल पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयात पार पडलेल्या मिरज तालुक्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्याच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सर्व तालुक्यात काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन आक्रमक भूमिका काँग्रेस पदाधिकारी घेण्याची चिन्हे दिसून येत आहेत.

दरम्यान, शिवसेनेच्या चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिल्यामुळे नाराज झालेले विशाल पाटील आणि विश्वजीत कदम हे बंडाच्या पवित्र्यात असल्याच्या चर्चा देखील रंगल्या आहेत. अशामध्ये या मतदार संघाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. आता काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक होत त्यांनी काँग्रेस कमिटी बरखास्त करण्याचा ठराव केला. त्याचसोबत सांगलीतील पक्ष कार्यालयावरील काँग्रेस शब्द पुसून टाकला. त्यामुळे आता पुढे नेमकं काय होणार आहे हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा :

कोल्हापूरची जागा काँग्रेसकडे आल्यानं सांगलीचा प्रश्न निर्माण झाला?

Hyundai Grand i10 नवीन व्हर्जनमध्ये लाँच; जबरदस्त लूक आणि दमदार इंजिन

हातकणंगलेत तीन अपक्ष आमदारांची बंद खोलीत चर्चा; कोरे-आवाडे- यड्रावकरांचं काय ठरलं