गेल्या सात दिवसांत झालेल्या मुसळधार(Kolhapur) पावसानंतर शनिवारी विश्रांती मिळाल्याने पुरस्थितीत काहीशी सुधारणा झाली आहे. पुराचे पाणी कमी होत चालले असून आज सकाळी ९ वाजता ५४ तासांनंतर मडीलगे बुद्रुक-कुर दरम्यानचा रस्ता खुला करण्यात आला आहे. पावसाचा जोर कमी आल्यामुळे वाहतूक सुरळीत सुरू आहे.
पाटगाव धरण क्षेत्रातील पावसाचा जोर कमी(Kolhapur) झाल्यामुळे धरण ९७.३४% भरले असून २०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. कोंडोशी प्रकल्प १००% भरला असून १०० क्युसेकने विसर्ग सुरू आहे.
गेल्या आठवडाभरात झालेल्या जोरदार पावसामुळे वेदगंगा नदीला महापूर आला आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे ऊस पिके कोलमडून गेली असून विद्युत तारा तुटल्यामुळे कोनवडे, नाधवडे, टिक्केवाडी, कुर येथील नागरिकांना वारंवार विद्युत खंडीतचा त्रास सहन करावा लागत आहे.
पाटगाव धरणावरील सहा बंधारे पाण्याखाली गेले आहेत. या वर्षी दुसऱ्यांदा पाणी पात्राबाहेर गेल्याने प्रांताधिकारी वसुंधरा बारवे, तहसीलदार अर्चना पाटील, भुदरगड पोलीस स्टेशन, महसूल विभाग नागरिकांना वेळोवेळी सूचना देत आहेत आणि पुरस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
हेही वाचा :
राजकारणातून होते आहे भाषा सभ्यता तडीपार!
थोडक्यात वाचला टीम इंडियाच्या खेळाडूचा डोळा! रक्तबंबाळ प्लेयरला पाहून गौतम झाला ‘गंभीर’ Video
आगामी निवडणुकीत तिसरी नाही, तर शेतकऱ्यांची आघाडी; बच्चू कडूंची मोठी घोषणा