हार्दिक पांड्यानंतर युझवेंद्र चहल घटस्फोटाच्या वादात? लग्नाच्या 3 वर्षानंतर अखेर होणार वेगळा

युझवेंद्र चहल-धनश्री वर्मा घटस्फोट : काही महिन्यांपूर्वी भारताचा अष्टपैलू हार्दिक पांड्या याने विश्वचषक झाल्यानंतर त्याची माजी पत्नी नतासा स्टॅनकोविचसोबत सोशल मीडियावर घटस्फोटाची(divorce) बातमी शेअर केली होती. याआधी बऱ्याच दिवसांपासून मीडियामध्ये त्यांच्या घटस्फोटाच्या बातम्या त्याचबरोबर वृत्तसमोर आले होते. भारतीय क्रिकेटर युझवेंद्र चहल आणि त्याची कोरिओग्राफर पत्नी धनश्री वर्मा सध्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहेत.

आता सोशल मीडियावर सध्या भारताचा फिरकी गोलंदाज युझवेंद्र चहल आणि कोरियोग्राफर धनश्री वर्मा या दोघांच्या घटस्फोटाच्या(divorce) बातम्या समोर आल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात कटुता असल्याच्या बातम्या येत आहेत. या जोडप्याने २२ डिसेंबर २०२० रोजी मोठ्या थाटामाटात लग्न केले आणि आता मीडिया रिपोर्ट्स सांगत आहेत की ते वेगळे होत आहेत. त्यांच्या घटस्फोटाच्या अफवांना जोर आला आहे.

वास्तविक, क्रिकेटर युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा यांच्या घटस्फोटाच्या अफवा सोशल मीडियावर बऱ्याच दिवसांपासून पसरत आहेत. आता, viralbhayani ने दिलेल्या वृत्तानुसार, जोडप्याच्या जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या जोडप्याच्या विभक्त होण्याच्या अफवा खऱ्या आहेत. घटस्फोटाची पुष्टी झाली आहे आणि काही काळानंतर ते अधिकृत होईल. मात्र, घटस्फोटाची प्रक्रिया अद्याप ठरलेली नाही. त्यांच्या विभक्त होण्यामागील कारण अद्याप समोर आलेले नाही, परंतु हे निश्चित आहे की या जोडप्याने त्यांचे जीवन वेगळे राहण्याचा निर्णय घेतला आहे.

२०२३ मध्ये, युजवेंद्र चहलने त्यांच्या इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली होती, ज्यामध्ये लिहिले होते, नवीन जीवन येत आहे. यानंतर अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्रामवरून चहल हे आडनाव काढून टाकले होते. आता ती फक्त धनश्री वर्मा लिहिते. यानंतर त्यांच्या घटस्फोटाच्या अफवांना जोर आला. एवढेच नव्हे तर दोघांनीही सोबतचे असलेले सोशल मीडियावरील फोटो देखील कडून टाकले आहेत. त्याचबरोबर सोशल मीडियावरून एकमेकांना अनफॉलो केले आहे. परंतु अजुनपर्यत दोघांनी यासंदर्भात कोणतीही माहिती दिलेली नाही.

झलक दिखला जा ११ च्या एका एपिसोडमध्ये धनश्रीला शोचे होस्ट गौहर खान आणि ऋत्विक धनजानी यांनी युजवेंद्रसोबतच्या तिच्या प्रेमकथेबद्दल विचारले होते. याबद्दल, कोरिओग्राफरने खुलासा केला होता की लॉकडाऊन दरम्यान युझवेंद्रने पहिल्यांदा डान्स शिकण्यासाठी त्याच्याशी संपर्क साधला तेव्हा याची सुरुवात झाली.

धनश्रीने खुलासा केला होता की, “लॉकडाऊनच्या काळात कोणतेही सामने होत नव्हते आणि सर्व क्रिकेटपटू घरी बसून निराश होत होते. त्या दरम्यान एके दिवशी युजींनी ठरवले की त्यांना डान्स शिकायचा आहे त्यांनी सोशल मीडियावर माझे डान्सचे व्हिडिओ पाहिले होते आणि त्या दिवसात मी डान्स शिकवत असे आणि त्यांनी माझा विद्यार्थी होण्यासाठी माझ्याशी संपर्क साधला. मी त्यांना शिकवायला तयार होतो.” डान्स शिकवताना हे जोडपे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यानंतर २०२० मध्ये लग्न केले.

हेही वाचा :

हिवाळ्यात शरीराला सूर्यप्रकाश न मिळाल्यास मानसिक आरोग्य ढासळण्याची भीती

घटस्फोटाच्या अफवांकडे दुर्लक्ष करून अभिषेक आणि ऐश्वर्या पुन्हा दिसले एकत्र

देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय; 963 शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनी परत मिळणार