हर्षवर्धन पाटील यांच्यानंतर आता ‘हा’ नेता फुंकणार ‘तुतारी’?; शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेशाची शक्यता

पुणे : लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना (शिंदे गट)-राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांच्या महायुतीला(politics) अपेक्षित असे यश मिळाले नाही. त्यामुळे आता या तिन्ही पक्षांकडून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली जात आहे. त्यानुसार, मोर्चेबांधणीही केली जात आहे. असे असताना काही नेतेमंडळी पक्ष सोडताना दिसत आहे. त्यात रणजितसिंह मोहिते पाटील हेदेखील शरद पवारांच्या पक्षात जाणार असल्याच्या चर्चा आहेत.

लोकसभा निवडणुकीत महायुतीला(politics) अपेक्षित यश मिळाले नाही. तर महाविकास आघाडीला मिळालेल्या यशानंतर राज्यात राजकीय समीकरणे बदलताना दिसत आहे. बंडखोरीनंतर अस्वस्थ झालेले शरद पवार यांनी आपल्या पाच दशकांचा राजकीय अनुभव पणाला लावत लोकसभा निवडणुकीत आपला ‘पॉवर’ सिद्ध केला आहे. ज्येष्ठ पवारांच्या करिष्म्यामुळे राष्ट्रवादी (अजित पवार) सह भाजप नेत्यांमध्येही अस्वस्थता वाढू लागली आहे.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी कंबर कसली असून, समरजितसिंह घाटगे यांना गळाला लावल्यानंतर आता शरद पवारांनी आपला मोर्चा सोलापूरकडे वळवला आहे. सोलापूरमध्ये लोकसभा निवडणूक तोंडावर असताना धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपला आव्हान देत खासदारकीची निवडणूक लढवली होती. आता रणजितसिंह मोहिते पाटीलसुद्धा तुतारी हाती घेणार का? अशी चर्चा रंगली आहे.

रणजितसिंह पाटील सध्या भाजपचे विधान परिषदेचे आमदार आहेत. मात्र, त्यांनी सोलापूर जिल्ह्यासाठी माझी कोणतीही तडजोड करण्याची तयारी असल्याचे वक्तव्य शरद पवारांच्या उपस्थित झालेल्या एका कार्यक्रमात केले होते. त्यामुळे रणजितसिंह मोहिते पाटील महाविकास आघाडी सोबत जाणार का? अशी चर्चा आहे.

शरद पवार गुरुवारी सायंकाळी सांगलीत होते. जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांच्या निवासस्थानी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी आटपाडीचे भाजपा नेते माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांनी भाजपाला धक्का देत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) मध्ये प्रवेश केला.

हेही वाचा:

इचलकरंजीत डॉल्बीचा अतिरेक: पोलीस निष्क्रिय, नागरिक त्रस्त

नवरात्री निमित्त: इचलकरंजीत स्वच्छता मोहीमेसाठी जनतेला आवाहन

पाडापाडीचं राजकारण थांबवा, उमेदवारांना निवडून आणा – संभाजीराजेंचा समाजाला सल्ला