टेनिसपटू सानिया मिर्झा तिचे वैयक्तिक आयुष्य आणि घटस्फोटामुळे नेहमीच चर्चेत राहिली आहे.(post)पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकसोबत घटस्फोट झाल्यानंतर, सानियाच्या आयुष्यात पुढे काय घडणार याकडे तिच्या चाहत्यांचे लक्ष लागले होते. अशातच, सानियाने केलेल्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली असून, ती नव्या व्यक्तीला डेट करत असल्याची अटकळ बांधली जात होती.

नुकतेच दिग्दर्शिका आणि कोरिओग्राफर फराह खानच्या वाढदिवसानिमित्त एका पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीला सानिया मिर्झानेही हजेरी लावली.(post) यावेळी, फराहला शुभेच्छा देताना सानियाने एक पोस्ट शेअर केली, ज्यामुळे सर्व चर्चांना सुरुवात झाली. सानियाने लिहिले, “सर्वांच्या आवडत्या आणि विशेषतः माझ्या आवडत्या व्यक्तीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. माझी आवडती डेट, फराह खान.”
सानियाच्या या पोस्टमधील ‘माझी आवडती डेट’ या उल्लेखामुळे, तिने २०२५ मध्ये मुव्ह ऑन करत नवीन नात्याची सुरुवात केली आहे की काय, अशी चर्चा सुरू झाली. शोएब मलिकने दुसरे लग्न केल्यानंतर सानियाच्या आयुष्यात आलेल्या या ‘डेट’बद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती.(post)मात्र, सानियाने ही पोस्ट तिची जवळची मैत्रीण असलेल्या फराह खानसाठीच केली होती आणि ‘डेट’ हा शब्द तिने केवळ मैत्रीच्या आणि आपुलकीच्या नात्याने वापरला होता. घटस्फोटानंतर सानिया तिच्या मुलासोबत आयुष्य जगत असून, तिच्या या पोस्टला चाहत्यांनी तिच्या आयुष्यातील सकारात्मक वळण मानले आहे. फराह खानने अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
हेही वाचा :
YouTube वर पैसे कमवणे आता अवघड! नियम बदलले, वाचा सविस्तर
घरात कडाक्याच भांडण झालं, नवऱ्याने रागारागात चौथ्या मजल्यावरुन उडी मारली; जागीच मृत्यू VIDEO VIRAL
शिवसेना पक्ष आणि चिन्हावर ‘या’ तारखेला सुप्रीम कोर्टात सुनावणी; महाराष्ट्राचे लक्ष या निर्णयाकडे