सांगली : मुस्लिमांच्या सासऱ्यांनंतर आता शरद पवारांचा अलिबाबा म्हणून उल्लेख; सदाभाऊ खोत

सांगली : आगामी विधानसभा(Political) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महायुती आणि महाविकास आघाडीतील नेत्यांकडून एकमेकांवर जोरदार टीका केली जात आहे. आता आमदार सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर तोफ डागली आहे. सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांचा उल्लेख अलिबाबा म्हणून केला आहे.

शरद पवार हे अलिबाबा आणि पवारांच्या(Political) भोवती जमलेले गडी हे चाळीस चोर आहेत’, अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली आहे. जतमध्ये पोलीस पाटील यांनी आयोजित केलेल्या राज्यस्तरीय अधिवेशन व शासन आभार मेळाव्यात सदाभाऊ खोत बोलत होते.

शरद पवार साहेबांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही. मात्र, मराठा आरक्षण आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिले. त्यामुळे हे पवार साहेबांच्या लक्षात आले की देवेंद्र फडणवीस हे जालीम औषध आहे. फडणवीस एकच गोळी देताय आणि सगळा रोग बरा करताय हे पवारांच्या लक्षात आले आहे. म्हणून सकाळ-संध्याकाळ उठले की सगळे देवेंद्र फडणवीस यांच्यावर ते बोलतात.

एकप्रकारे पवारांपासून संजय राऊत यांच्यापर्यंत सगळ्यांना देवेंद्र फडणवीस नावाचा भस्म्या रोगच झाला आहे. या लोकांना देवेंद्र फडणवीस शिवाय दुसरं काही दिसत नाही, अशा हल्लाबोल सदाभाऊ खोत यांनी केला आहे. तर आता सदाभाऊ खोत यांच्या टीकेवर शरद पवार गट काय प्रत्युत्तर देणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी अहमदनगर शहराचे नाव हे अहमदनगरच ठेवावं, यासाठी मुस्लीम बांधवानी शरद पवारांसमोर आंदोलन केले होते. यावेळी शरद पवारांवर टीका करताना सदाभाऊ खोत यांची जीभ घसरली होती. सदाभाऊ भाऊ खोत यांनी मुस्लीमांना शरद पवारांचे जावई असे संबोधले होते. त्यांनी म्हटलं होतं की, हा आंदोलनाचा प्रकार शरद पवारांच्या ताफ्यासमोरच का व्हावा, कारण त्यांना माहिती आहे की, आपला सासरा आता आलेला आहे. त्यामुळे जावयांनी तिथे आरोळी दिली की, अहमदनगरचे नाव अहमदनगरच ठेवा, असे सदाभाऊ खोत यांनी म्हटले होते.

हेही वाचा:

आता गुगल चालवण्यासाठी पैसे द्यावे लागतील? 

मतदानानंतर काँग्रेसचं नाव घेताच वृद्धाला बेदम मारहाण; परिसरात तणाव

भारत-पाकिस्तान मॅचसाठी टॉस जिंकून बॅटिंग की बॉलिंग? पिचची स्थिती ठरवणार निर्णायक भूमिका!

गौतम गंभीरचा मास्टर प्लॅन! 5 नंबरला खेळणारा खेळाडू करणार ओपनिंग?

राज्यातील ‘या’ कुटुंबांना मिळणार 7000 रुपये