विधानसभेनंतर आता शिरसाटांच्या घरासमोर तुफान राडा

पावसाळी अधिवेशकाळात विधानसभा(political news) परिसरात आव्हाड आणि पडळकरांचे कार्यकर्त्ये भिडल्याचे प्रकरणा ताजे असतानाच छ.संभाजीनगरमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे.

मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास मंत्री संजय शिरसाट यांच्या घरावर एका तरूणाने शिव्यादेत दगडफेक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, या तरूणाने नेमका हल्ला का केला याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

याबाबत अधिक माहिती अशी की, सौरभ घुले असे शिरसाटांच्या(political news) घरावर दगडफेक करणाऱ्या तरूणाचे नाव आहे. मध्यरात्रीच्या सुमारास छ.संभाजीनगर येथील मंत्री शिरसाटांच्या बंगल्यासमोर घुले याने मद्यधूंद अवस्थेत जोरदार शिवीगाळ करत दगडफेक केली.

घटनेवेळी घुले याला रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र, त्यानंतरही त्याने शिवीगाळ करत बंगल्यावर दगडफेक केल्याचे सांगितले जात आहे. सध्या घुले याला ताब्यात घेण्यात आले असून, घरावर हल्ला केल्याप्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा :

टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, तीन दिवसात तिसऱ्या खेळाडूला दुखापत, स्टार खेळाडू संपूर्ण सीरिजमधून बाहेर

कामाची बातमी! आता EPFOची सर्व माहिती मिळणार डिजीलॉकरवर, कसं? वाचा सविस्तर

‘लग्नात अक्षतांऐवजी वाटल्या झाडांच्या बिया’; उंडाळ्यात पाटील कुटुंबीयांचा उपक्रम, पर्यावरण संवर्धनाचा संदेश