विराट, रोहितनंतर आता ‘या’ दिग्गज खेळाडूकडून निवृत्तीची घोषणा

भारताचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजाने देखील टी 20 क्रिकेटमधून निवृत्तीचा(retirement) निर्णय घेतला आहे. विराट कोहली, रोहित शर्मानंतर आता रविंद्र जडेजाने टी 20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. हे तिघेही टीम इंडियाचे वरिष्ठ खेळाडू आहेत. भारताने दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव करत वर्ल्डकप जिंकला. त्यानंतर संघातील या वरिष्ठ खेळाडूंनी निवृत्ती जाहीर केली.

विराट कोहली, रोहित शर्मानंतर रवींद्र जडेजानं देखील टी 20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती(retirement) जाहीर केली आहे. सुसाट वेगानं अभिमानानं धावणाऱ्या अश्वमेधाप्रमाणं माझ्या देशासाठी मी माझं सर्वोत्तम देण्याचा नेहमी प्रयत्न केला.

इतर फॉरमॅटमध्ये मी माझं सर्वोत्त योगदान देण्याचा प्रयत्न करणार आहे. टी 20 वर्ल्डकप जिंकण हे स्वप्न सत्यात उतरलं आहे. माझ्या टी 20 कारकिर्दीचं सर्वोच्च शिखर आहे. अनेक आठवणी, प्रोत्साहन अन् पाठिंब्यासाठी सर्वांना धन्यवाद, असं रवींद्र जडेजा म्हणाला.

हेही वाचा :

विश्वचषक सामना संपल्यानंतर आनंद व्यक्त करताना दोन गटात गोळीबार अन् कोयत्याने राडा

शरद पवार अजितदादांच्या आणखी एका बालेकिल्ल्याला सुरुंग लावणार…

विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठीचा काय आहे महाविकास आघाडीचा प्लॅन? पवारांनी थेटच सांगितलं