ओवळे खाडीत जीव धोक्यात घालून आंदोलन

ओवळे, रायगड: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय (International)विमानतळ प्रकल्पातील पुनर्वसन आणि योग्य मोबदल्याच्या मागण्यांसाठी प्रकल्पग्रस्तांनी आज ओवळे खाडीत उतरून ‘जलसत्याग्रह’ केला. सिडको आणि अदानी समूहाच्या विरोधात प्रकल्पग्रस्तांनी आपला जीव धोक्यात घालून हे आंदोलन केले.

प्रकल्पामुळे विस्थापित होणाऱ्या लोकांच्या मागण्यांकडे शासन आणि संबंधित कंपन्यांकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. योग्य मोबदला, पुनर्वसन आणि रोजगाराच्या हमीची मागणी आंदोलकांनी केली आहे.

प्रशासनाने आंदोलकांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला असला तरी तोडगा निघालेला नाही. या आंदोलनामुळे विमानतळ प्रकल्पाच्या कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :

मोठी बातमी, गौतम गंभीर याची भारताच्या मुख्य प्रशिक्षक पदी निवड

सारा नाही तर ‘या’ अभिनेत्रीशी करणार शुभमन गिल लग्न?, चर्चेला उधाण

25 जून हा ‘संविधान हत्या दिन’ म्हणून घोषित, मोदी सरकारचा मोठा निर्णय