अभिनेत्री ऐश्वर्या नारकर त्यांच्या नृत्यशैलीमुळे कायमच(make up) लक्ष वेधून घेतात. अभिनयाव्यतिरिक्त ऐश्वर्या नारकर सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी कनेक्ट असतात. ऐश्वर्या नारकर या पती अविनाश नारकरसोबत नेहमीच नवनवीन डान्सचे व्हिडीओ पोस्ट करतात.सोशल मीडियावर ऐश्वर्या नारकर यांचा मोठा चाहतावर्ग आहे . त्यांचे डान्सचे व्हिडीओ तुफान व्हायरल होत असतात.
नुकतंच ऐश्वर्या नारकर यांनी नवीन रिल शेअर केली आहे. या व्हिडीओमध्ये (make up)तुम्ही पाहू शकता, ऐश्वर्या नारकर यांनी बंगाली लूक केला आहे. बंगाली साडीमधला त्यांच्या डान्सने भुरळ घातली आहे.
ऐश्वर्या नारकर यांनी रायन चित्रपटातील ‘ए. आर. रेहमान’ यांच्या ‘वॉटर पॅकेट’ या गाण्यावर डान्स केला आहे. सोशल मीडियावर ऐश्वर्या नारकर यांच्या डान्स व्हिडीओला नेटकऱ्यांनी पसंतीस दिली आहे. नेटकऱ्यांनी त्यावर ‘खूप सुंदर’, ‘तुमची एनर्जी कमाल आहे’, ‘कडक’ अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.
ऐश्वर्या नारकर या ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत दिसत आहे. या मालिकेत ऐश्वर्या नारकर यांनी विरोचकाची भूमिका साकारली आहे. या मालिकेमध्ये नवा ट्विस्ट येणार असून विरोचकाचा अंत झाल्यानंतर ऐश्वर्या नारकरची भूमिका काय असेल? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मालिकेतील नव्या ट्विस्टमुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
हेही वाचा :
बंदूक काढली अन् स्वत:वर गोळी झाडली, कर्मचाऱ्यांसमोरच व्यापाऱ्याचं धक्कादायक पाऊल
मुख्यमंत्र्यांची बहिण म्हणतेय आता लय भारी वाटतंय….!
विनेश फोगटला धक्का, पदक मिळणार नाही, CAS ने याचिका फेटाळली