अल्लू अर्जुनच्या चाहत्यांना धक्का, ‘पुष्पा’ पुन्हा जाणार तुरुंगात?

सुपरस्टार(Superstar) अल्लू अर्जुन सध्या एका प्रकरणामुळे चर्चेत आला आहे. त्याला काही दिवसांपूर्वी अटक करण्यात आली होती. हैदराबादमधील संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीप्रकरणी अभिनेत्याला 13 डिसेंबररोजी अटक करण्यात झाली होती. मात्र, त्याच्या दुसऱ्याच दिवशी तो तुरुंगातून सुटला होता. तेलंगणा हायकोर्टने त्याला 4 आठवड्यांचा अंतरिम जामीन मंजूर केला आहे. अशात अल्लू अर्जुनच्या अडचणी आणखी वाढणार असल्याची माहिती समोर येत आहे.

कनिष्ठ न्यायालयाने त्याला 14 दिवसांची कोठडी सुनावली होती, मात्र त्यानंतर त्याला उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला.एकाच रात्रीत अल्लू अर्जुनला जामीन मिळाला होता. मात्र, रात्री उशिरापर्यंत कारागृह प्रशासनाला जामिनाची प्रत न मिळाल्याने अल्लू अर्जुनला संपूर्ण रात्र कारागृहातच काढावी लागली.कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशानंतर अल्लू अर्जुनला चंचलगुडा तुरुंगात पाठवण्यात आले होते. अटकेच्या दुसऱ्या दिवशी सकाळी त्याची सुटका झाली.

आता समोर आलेल्या माहितीनसुार अल्लू अर्जुन(Superstar) याला मिळालेल्या जामिनाविरोधात तेलंगणा पोलीस सुप्रीम कोर्टात जाण्याची शक्यता आहे. आता जर अल्लू अर्जुन याचा जमीन रद्द झाला तर पुन्हा एकदा त्याची रवानगी तुरुंगात होऊ शकते. यामुळे अभिनेत्याच्या अडचणी आणखी वाढू शकतात.

तुरुंगातून बाहेर आल्यानंतर अल्लू अर्जुनने संतापजनक प्रतिक्रिया दिली होती. मला माझ्या बेडरूमध्ये घुसून अटक करण्यात आली, मला नाष्टा देखील करू दिला नाही, कपडेही घालू दिले नाहीत, असं अल्लू अर्जुन म्हणाला होता. आता समोर आलेल्या या माहितीमुळे अल्लू अर्जुनचे चाहते देखील चिंतेत पडले आहेत.

देशभरासह अनेक देशांत रिलीज झालेल्या अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा 2’ ची क्रेझ अजूनही कायम आहे. 4 डिसेंबर चित्रपट सिनेमा गृहात रिलीज झाला होता. हा चित्रपट बघण्यासाठी हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. मात्र, यावेळी सिनेमागृहात अभिनेता अल्लू अर्जुन येणार, अशी माहिती समजली. अल्लू अर्जुन येणार असल्याचे समजताच सिनेमागृहात चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली. मात्र तो कधी येईल याची कोणतीही माहिती सिनेमागृहाच्या व्यवस्थापकांकडून किंवा कलाकारांच्या टीमकडून पोलिसांना देण्यात आली नाही.

रात्री 9.30 च्या सुमारास अल्लू अर्जुन याने संध्या थिएटरमध्ये प्रवेश केला. यावेळी जमलेल्या सर्व लोकांनीही त्याच्यासोबतच आत येण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी अल्लू अर्जुन याच्या वैयक्तिक सुरक्षा पथकाने लोकांना धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली. यामुळे येथे परिस्थिति चिघळली. अचानक झालेल्या गर्दीमुळे येथे चेंगराचेंगरी झाली. अभिनेता येणार होता, अशी माहिती असताना देखील थिएटर व्यपस्थापनाने त्यांच्यासाठी वेगळा प्रवेश किंवा जाण्यासाठी वेगळा मार्ग केला नव्हता, यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली असल्याचं बोललं जातंय.

या गर्दीतच अल्लू अर्जुनचा चित्रपट पाहण्यासाठी आलेली महिला रेवती आणि तिचा मुलगा या दोघांचा जीव घुसमटला. तिथे ड्युटीवर तैनात असलेल्या पोलिसांनी त्यांना कसंबस बाहेर काढत तात्काळ रुग्णालयात नेलं. मुलावर नजीकच्या दुर्गाबाई देशमुख हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले.मात्र, त्याची आई, रेवती यांचा घुसमटून मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी संध्या थिएटरचे व्यवस्थापक, अभिनेता अल्लू अर्जुन तसेच त्याची सुरक्षा टीम यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. यामुळे अल्लू अर्जुनला अटक झाली होती.

हेही वाचा :

मुलाच्या वाढदिवसाची तयारी करताना इमारतीत लागली आग; पुढे जे घडलं…

वाहतुकीचे नियम मोडणं रॅपर बादशहाला पडलं महागात, भरावा लागला ‘इतका’ दंड

खुशखबर! लाडक्या बहिणींची संक्रांत गोड होणार, डिसेंबर-जानेवारीचे ३००० रुपये एकत्र मिळणार?