ऑक्टोबरमध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा; सर्व प्रक्रिया 26 नोव्हेंबरपूर्वी पूर्ण होणार

केंद्रीय निवडणूक (election)आयोगाने आज जाहीर केले की, महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची घोषणा ऑक्टोबर महिन्यात होणार असून, निवडणुकीची सर्व प्रक्रिया 26 नोव्हेंबरपूर्वी पूर्ण केली जाईल. हरियाणा आणि जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकांच्या तारखाही जाहीर करण्यात आल्या आहेत, मात्र महाराष्ट्र आणि झारखंडच्या निवडणुकांसाठी काही विलंब झाला आहे.

पुराच्या परिस्थितीमुळे निवडणुकीत विलंब
महाराष्ट्रातील पूर परिस्थितीमुळे मतदान अधिकारी आपले काम वेळेवर पूर्ण करू शकले नाहीत, त्यामुळे निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका काही काळासाठी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे की, महाराष्ट्र आणि झारखंडची निवडणूक एकाचवेळी घेतली जाईल.

जम्मू-काश्मीर आणि हरियाणातील निवडणुकांचे वेळापत्रक
जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेच्या निवडणुका तीन टप्प्यांत, 18 सप्टेंबर, 25 सप्टेंबर, आणि 1 ऑक्टोबर रोजी होणार आहेत, तर हरियाणातील निवडणूक एकाच टप्प्यात पार पडणार आहे. यांचे निकाल 4 ऑक्टोबर रोजी घोषित केले जातील.

सणासुदीच्या काळात महाराष्ट्रातील निवडणुका
महाराष्ट्र सध्या सणासुदीच्या कालावधीत आहे, त्यामुळे निवडणूक आयोगाने याकाळात निवडणुका जाहीर न करण्याचा निर्णय घेतला आहे. तथापि, ऑक्टोबर महिन्यात महाराष्ट्रातील निवडणुकीची घोषणा होईल आणि सर्व प्रक्रिया 26 नोव्हेंबरपूर्वी पूर्ण होईल.

मुख्य निवडणूक आयुक्तांचा निवडणुकीच्या तयारीचा आढावा
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी जम्मू-काश्मीर विधानसभेच्या निवडणुकांच्या तयारीची माहिती दिली. त्यांनी स्पष्ट केले की, सर्व उमेदवारांना निवडणुकीदरम्यान कडेकोट सुरक्षा पुरवली जाईल. तसेच, राज्य सरकारांना निवडणुकीपूर्वी बदल्या करण्याचे अधिकार आहेत आणि त्यात आयोग हस्तक्षेप करू शकत नाही, असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा :

महाराष्ट्रात स्वस्त 4G सेवा लाँच; MTNL आणि BSNL च्या युतीने Jio आणि Airtelचे वाढवले टेन्शन

रोज सकाळी रिकाम्यापोटी तुळशीच्या पानांचे सेवन केल्याने शरीरावर होणारे परिणाम:

पंजाब किंग्जच्या मालकांमध्ये मतभेदांचा वाद न्यायालयात; प्रीती झिंटा थेट कोर्टात