भाजपने गेल्या दोन वर्षांत राज्यातील राजकारणाला सर्वाधिक हादरे दिले(congress). शिवसेना आणि राष्ट्रवादीत भूंकप घडविण्यात भाजपने त्यांची भूमिका लपवलेली नाही. भाजपने काँग्रेसमध्ये पण खिंडार पाडण्याचा प्रयत्न केला. काही पट्टीचे नेते हाताशी घेतले. अशोक चव्हाण यांनी नुकताच भाजपचा झेंडा हाती घेतला.
आता काँग्रेसचे(congress) ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे हे पण भाजपच्या वाटेवर असल्याचा दावा करण्यात येत आहे. लोकसभा निवडणूक झाली की सुशीलकुमार शिंदे भाजपवासी होतील असा गौप्यस्फोट वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
सुशीलकुमार शिंदे भाजपमध्ये प्रवेश करण्याचे कारण पण आंबेडकरांनी दिले आहे. सोलापूरचे कॉग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांची चौकशी लागेलेली आहे. त्यामुळे ते भाजपत जातील. माझ्या माहितीप्रमाणे शिंदे यांची चौकशी थांबवलेली आहे. ही चौकशी थांबवण्यासाठी शिंदे भाजपामध्ये जातील. संविधान बदलेल अमुक बदलेल याच्याशी त्यांना काही देणे घेणे नाही.त्यांनी जमवलेली माया वाचवणे एवढेच त्यांचे टार्गेट आहे, अशी खोचक टीका पण आंबेडकरांनी केली. ते सोलापूरमध्ये जाहीर सभेत बोलत होते.
राज्यात आम्हाला चांगला प्रतिसाद आहे. मागीलवेळीपेक्षा चांगला रिस्पॉन्स मिळतोय आणि आमचे खाते उघडेल असेल वाटतेय. पॉजिटीव्ह चित्र होईल, पण 4 तारखेपर्यंत आम्ही होल्ड ऑन करणार आहोत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राज्यात वंचित खाते उघडणार असा दावा त्यांनी केला आहे.
यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. मोदी सरकारचा 10 वर्षांचा कार्यकाळ काळाकुट्ट असल्याचा हल्लाबोल त्यांनी केला. व्यसनात बुडालेले लोक बापजाद्यांची मालमत्ता संपवून टाकतात. दारुड्याची वृत्ती आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वृत्ती एकच असल्याची जळजळीत टीका पण आंबेडकरांनी केली.
17 लाख हिंदू कुटुंबानी या दहा वर्षांत देशाचे नागरिकत्व नाकारल्याचा आरोप त्यांनी केला. हे हिंदू आता परदेशात स्थायिक झाल्याचा दावा आंबेडकरांनी केला. परदेशात गेलेल्या या हिंदूना मोदी सरकार धमक्या देत असल्याचा आरोप आंबेडकरांनी केला. त्यामुळे आता आणखी एका नव्या वादाला तोंड फुटले आहे.
हेही वाचा :
मोदींचाच आत्मा वखवखलेला; शरद पवारांवरील पंतप्रधानांच्या टीकेनंतर उद्धव ठाकरेंचा पलटवार
सांगलीच्या जागेबाबत शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले, याची चर्चा न होता थेट टीव्हीवरच..
सांगलीत भाजपचा अधिकृत अन् एक अनधिकृत उमेदवार; संजय राऊतांचा विशाल पाटील यांना टोला