मुलांच्या स्मार्टनेसवर मुली फिदा? हुशारी, नेतृत्व आणि नाते यात भले मोठे संबंध

आजच्या मुलींना फक्त देखणेपण नव्हे, तर हुशारी, नेतृत्वगुण आणि समजूतदारपण(leadership) असलेले मुलं अधिक आकर्षित करतात. स्मार्टनेस म्हणजे केवळ स्टाइल नाही, तर जबाबदारी आणि भावनिक स्थैर्याचाही समतोल आहे.

आजच्या तरुण पिढीत ‘स्मार्ट’ ही संज्ञा केवळ दिसण्यात मर्यादित राहिलेली नाही,(leadership) तर ती आता हुशारी, संवादकौशल्य, निर्णयक्षमता आणि जबाबदारीच्या जाणिवेशी जोडली गेली आहे. अनेक मुली आता अशा मुलांकडे आकर्षित होतात जे केवळ चांगले दिसतात म्हणून नाही, तर जे बौद्धिकदृष्ट्या स्मार्ट आहेत, जे निर्णय घेताना आत्मविश्वास दाखवतात आणि नात्यांमध्ये स्पष्टपणा आणि स्थिरता राखतात.

हुशारी हे आकर्षणाचं पहिलं पाऊल ठरतं. चांगलं बोलता येणं, योग्य जागी योग्य गोष्ट सांगणं,(leadership) समोरच्याचं ऐकून घेणं आणि त्यावर विचारपूर्वक उत्तर देणं, हे सर्व गुण आजच्या तरुण मुलींना आवडतात. त्यातच जर मुलगा अभ्यासू आणि काहीतरी वेगळं करणारा असेल, तर तो अधिक लक्ष वेधतो.

नेतृत्वक्षमता ही दुसरी महत्वाची गोष्ट आहे. कॉलेजमध्ये, ऑफिसमध्ये किंवा एखाद्या गटात जर एखादा मुलगा जबाबदारीने पुढे येतो, लोकांना एकत्र ठेवतो आणि समस्यांवर उपाय शोधतो, तर तो ‘लीडर’ ठरतो. आणि हेच अनेक मुलींना आवडतं. अशा व्यक्तीकडे सुरक्षिततेची भावना असते, आणि तो भविष्यासाठी योग्य जोडीदार वाटतो.

नात्यांमध्ये समजूतदारपणा आणि भावनिक स्थैर्यही तितकंच महत्वाचं. एकटा ‘स्मार्ट’ असणं पुरेसं नाही, तर नातं टिकवण्यासाठी समोरच्याच्या भावना समजून घेणं, त्यांचं महत्त्व ओळखणं आणि त्यांच्यासोबत संवाद साधणं गरजेचं असतं. जे मुलं हे समजतात, ते सहजपणे मुलींच्या मनात स्थान मिळवतात.

हेही वाचा :

भारतातील असे 3 शिवमंदिर जिथे मिळते खाण्यापिण्याची आणि राहण्याची फ्री सुविधा; यंदाच्या श्रावणात एकदा नक्की भेट द्या
महादेवी हत्तीणीसाठी नांदणी ते कोल्हापूरआत्मक्लेश मूक मोर्चा
“संशया”वरून दोष सिद्धी नाही “मालेगाव स्फोट”आरोपी निर्दोष