राज्यातील आयपीएस (ips)अधिकारी, आयएएस अधिकारी, लोकप्रतिनिधी, न्यायमूर्तींच्या गृहनिर्माण संस्थांना सवलतीच्या दरात वांद्रय़ाच्या पूर्वेला भूखंड दिले आहेत. पण आमच्या हक्काच्या घरांसाठी माफक रक्कम देण्याची तयारी असूनही सरकारी कर्मचाऱयांना पुनर्विकासात हक्काची घरे मिळत नाहीत, अशी खंत वांद्रे पूर्व येथील शासकीय वसाहतीतील सरकारी कर्मचारी व अधिकारी व्यक्त करतात. त्यामुळे हक्काच्या घरांसाठी सरकारी वसाहतीमधील अधिकारी-कर्मचाऱयांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कारास्त्र कायम ठेवले आहे.
वांद्रे पूर्व येथील शासकीय वसाहतीच्या पुनर्विकास योजनेत कर्मचाऱयांना व अधिकाऱयांना माफक दरात मालकी हक्काची घरे मिळण्याच्या मागणीसाठी या वसाहतीतील रहिवाशी आग्रही आहेत. विविध गृहनिर्माण योजनांच्या माध्यमातून झोपडपट्टीधारक, गिरणी कामगार, बीडीडी चाळीतील रहिवाशी, सफाई कामगार, संक्रमण शिबिरातील रहिवाशी, अतिक्रमण करणारे, अनधिकृत बांधकाम करणारे अशांना राहत्या ठिकाणी मोफत घरे दिली आहेत. खेळाडू, साहित्यिक पत्रकार व अन्य प्रतिष्ठत व्यक्तींना दहा टक्के कोटय़ातील घरे तसेच माफत दरात भूखंड दिले आहेत. काळाचौकी येथील शासकीय वसाहतीत(ips) राहाणाऱया कर्मचाऱयांना व अधिकाऱयांना राहती घरे नाममात्र दरात मालकी तत्त्वावर दिली आहेत. बीडीडी चाळींच्या पुनर्विकासात पोलीस कर्मचाऱयांना बांधकाम खर्च आकारून 15 लाख रुपयांच्या सवलतीच्या दरात 500 चौरस फुटांची घरे देण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला आहे.
आम्ही सुमारे 30 ते 35 वर्षे शासनाची इमानेइतबारे सेवा केली आहे. सेवानिवृत्त झाल्यावर येथील कर्मचाऱयांना बेघर व्हावे लागते. सनदी अधिकाऱयांना सवलतीच्या दरात गृहनिर्माण संस्थांसाठी भूखंड दिले जातात. घरासाठी काही सवलतीची रक्कम मोजण्याची आमचीही तयारी आहे. मग आम्हाला वेगळा न्याय का, असा सवाल सरकारी कर्मचारी विचारत आहेत.
सवलतीची घरे भाडय़ाने
अनेक वर्षे या वसाहतीमध्ये वास्तव्य केल्यामुळे या वसाहतीशी आमचे व आमच्या कुटुंबियांचे भावनिक व सांस्कृतिक नाते निर्माण झाले आहे. पण सवलतीच्या दराने भूखंड घेऊन निर्माण केलेल्या गृहनिर्माण संस्थांमधील घरे भाडय़ाने दिली आहेत. न्यायमूर्तींच्या इमारतीमधील घरामध्ये पेंद्रीय मंत्री भाडय़ाने राहतात. अशी अनेक घरे भाडय़ाने दिली आहेत हे सर्व फ्लँट एक हजार चौरस फुटांचे आहेत. याकडे सरकारी कर्मचारी लक्ष वेधतात.
हेही वाचा :
कोल्हापूर लोकसभेत याराना सेफ ..!
CSK ला मोठा धक्का! संघातील प्रमुख फलंदाज संपूर्ण स्पर्धेतून बाहेर
कोल्हापूर : महाराष्ट्र दिनाला होणार महाविकास आघाडीचा महामेळावा !