मोबाइल रोजच्या जीवनाचा एक भाग झालाय. साध्या फोन्सची जागा स्मार्टफोनने घेतलीय. कुणाला साधा फोन करायचा असो किंवा इंटरनेटच्या(internet) विश्वात वावरायचं असो प्रत्येक काम स्मार्टफोनवरच होतंय. पण यात एक गोष्ट तुमच्या लक्षात आलीय का.. तुम्ही तुमच्या मोबाइलवरून एखाद्याला फोन करता, त्याच्याशी बोलता त्यावेळी बऱ्याचदा तुमच्या फोनमधील इंटरनेट चालूचअसतं.
तुम्ही म्हणाल यात काय विशेष? पण थांबा इतकं हलक्यात घेऊ नका. खरा धोका इथेच आहे. कॉल करताना इंटरनेट(internet) चालू ठेवल्याने धोका वाढू शकतो. सरकारने याबाबत इशारा दिला आहे. हा नेमका काय प्रकार आहे? यातून कोणता धोका निर्माण होऊ शकतो? याची उत्तरं मिळवू या..
Cyber Dost च्या माध्यमातून सरकार सायबर सेफ्टी आणि सायबर सिक्युरिटीच्या संदर्भात जनजागृती करण्याचं काम करतं. केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाच्या अंतर्गत सायबर दोस्त काम करते. आता सायबर दोस्तच्या अधिकृत एक्स हँडलवरून एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.
यात पोलीस अधिकाऱ्याने स्पष्ट शब्दांत सांगितलं आहे की कोणत्याही परिस्थितीत कॉलिंग दरम्यान फोनमधील इंटरनेट(internet) चालू ठेऊ नका. गुगल क्रोमच्या सेटिंग्समध्ये जाऊन मोबाइलचा मायक्रोफोन चालू आहे की बंद याची माहिती कशी घेता येईल हे देखील या व्हिडिओत दाखवलं आहे.
जर मोबाइलवरून एखाद्याला कॉल केला याच दरम्यान जर मोबाइलमधील इंटरनेट कनेक्शन सुरुच असेल तर अॅप्स लोकांचे बोलणे गुपचूप ऐकू शकतात अशी माहिती एक पोलीस अधिकारी या व्हिडिओत देताना दिसत आहे. ही चूक मोबाइल युजर्सच्या सुरक्षिततेसाठी नक्कीच धोकादायक ठरू शकते. यात एक प्रश्न असा आहे की मोबाइलमधील अॅप बोलणे कसे ऐकू शकतात? जर असं असेल तर मग हा प्रकार बंद करण्याचा मार्ग कोणता? याही प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊ या..
हेही वाचा :