सैफ अली खान आणि रणबीर कपूरमध्ये वाद? सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

सैफ अली खान आणि रणबीर कपूर मुंबईत आयोजित राज कपूर फिल्म फेस्टिवलमध्ये(film festival) सहभागी झाले होते. या कार्यक्रमात कपूर कुटुंब सहभागी झाले होते. त्याचबरोबर अनेक कलाकार देखील या ठिकाणी उपस्थित होते. या कार्यक्रमातील कलाकारांचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

दरम्यान, याच फेस्टिवलमधील(film festival) एक व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे. ज्यामध्ये सैफ अली खान हा रणबीर कपूरवर नाराज होताना दिसत आहे. सैफ अली खान आणि रणबीर कपूर यांच्यातील वादाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये सैफ अली खान आणि रणबीर कपूर यांच्यामध्ये वाद होत असल्याच दिसत आहे. रणबीर कपूर सैफ अली खानला स्क्रिनिंगकडे घेऊन जाताना दिसत होता, तेव्हा सैफ अली खान थोडासा चिडलेला दिसत आहे. त्याचबरोबर व्हिडीओमध्ये सैफ अली खान हा रागात ठीक आहे असं म्हणताना दिसत आहे.

यासोबत या फेस्टिवलमध्ये आलिया भट्ट, रणधीर कपूर, बबीता, नीतू कपूर, करिश्मा कपूर आणि रिद्धिमा कपूरसह अनेक कलाकार उपस्थित होते. महेश भट्ट, रेखा, कार्तिक आर्यन, संजय लीला भंसाली, शर्वरी, फरहान अख्तर, रेखा, विक्की कौशल, पद्मिनी कोल्हापुरी, बोनी कपूर, सोनी राजदान आणि शाहीन भट्ट यांच्यासह अनेक कलाकार उपस्थित होते.

या फेस्टिवलमध्ये राज कपूर यांचे 10 मोठे चित्रपट दाखवले जाणार आहेत. चार दशकांपासून प्रेक्षकांच्या ह्रदयावर राज्य करणाऱ्या राज कपूर यांचे सर्वाधिक लोकप्रिय चित्रपट या फेस्टिवलमध्ये दाखवण्यात येणार आहेत. ज्यामध्ये 1948 मध्ये प्रदर्शित झालेला ‘आग’, 1949 ‘बरसात’, 1951 ‘आवारा’, 1955 ‘श्री 420, 1956 ‘जागते रहो’, 1960 ‘जिस देश में गंगा बहती है’, 1964 ‘संगम’, 1970 ‘मेरा नाम जोकर’, 1973 ‘बॉबी’ आणि 1985 मधील ‘राम तेरी गंगा मैली’ या चित्रपटांचा समावेश असणार आहे.

हेही वाचा :

राज्यात थंडीची लाट; पारा दहा अंशांखाली…

“…तर फडणवीसांचं 90 टक्के मंत्रीमंडळ रिकामं होईल”; राऊतांचं वक्तव्य

महायुतीत नाराजीची लाट! नाराजांनी अधिवेशन सोडले; भाजप समर्थक आमदार थेट घरी