आम आदमी पक्षाचे राज्यसभा सदस्य संजय सिंह यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (leader) यांच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त करत भाजपशासित केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. पक्ष कार्यालयात पत्रकारांशी बोलताना संजय सिंह यांनी केजरीवाल यांचं वजन साडेआठ किलोने कमी झाल्याचा दावा केला आणि त्यांच्या आरोग्यावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
संजय सिंह यांनी सांगितलं की, २१ मार्चपासून केजरीवाल(leader) यांचं वजन ७० किलोवरून ६१.५ किलोपर्यंत कमी झालं आहे. त्यांच्या वजन कमी होण्याचे कारण स्पष्ट नसल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच, त्यांनी दावा केला की पाच वेळा रात्री अचानक केजरीवालांची शुगर लेव्हल ५० वरूनही खाली आली, ज्यामुळे ते कोमामध्येही जाऊ शकतात.
संजय सिंह यांनी आरोप केला की, केंद्र सरकार केजरीवाल यांना जेलमधून बाहेर येऊ देत नाही आणि त्यामुळे त्यांची आरोग्य तपासणी होऊ शकत नाही. त्यांनी हा आरोप करताना केजरीवाल यांच्या आरोग्याशी खेळ करण्याचा आरोप सरकारवर केला.
एका प्रश्नाच्या उत्तरामध्ये संजय सिंह यांनी भाजप सरकारवर टीका करत २५ जून रोजी संविधान हत्येचा दिवस पाळण्याच्या विचाराला विरोध केला. त्यांनी म्हटलं की, जर २५ जून संविधान हत्येचा दिवस मानला जात असेल तर ३० जानेवारी, ज्या दिवशी महात्मा गांधींची हत्या झाली, तो दिवस आणि प्रत्येक तो दिवस संविधान हत्येचा दिवस मानला पाहिजे, जेव्हा भाजपने अनेक राज्यांमधले सरकार पाडले होते. संजय सिंह यांच्या या वक्तव्यांमुळे राजकीय वातावरण तापले असून, भाजपकडूनही प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे.
हेही वाचा :
अनंत-राधिकाचं लग्न सोडून रोहित शर्मा लंडनवारीला!
”वाघनखं कोल्हापुरात आणली तर…” सुधीर मुनगंटीवारांच्या विरोधात आंदोलन
“पुन्हा आमचे सरकार येणार नाही,” भाजप आमदाराच्या व्हायरल व्हिडिओमुळे खळबळ