सायबर फसवणुकीच्या घटना वाढत असताना: मंत्री हसन मुश्रीफांचा सायबर क्राइम विभागावर सवाल

राज्यात सायबर फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री (minister)हसन मुश्रीफ यांनी सायबर क्राइम विभाग आणि राज्य शासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

पुण्यातील एका निवृत्त शिक्षिकेची २० लाख रुपयांची फसवणूक झाल्यानंतर, मुश्रीफ यांनी अशा प्रकारच्या घटनांवर चिंता व्यक्त केली आणि सायबर गुन्हेगारांना कडक शिक्षा देण्याची मागणी केली आहे.

ही घटना अशी घडली की, हडपसर येथे राहणाऱ्या ७० वर्षीय उषा मुरलीधर व्यास यांना एका तोतया पोलीस उपायुक्ताने फोन करून, ‘तुम्ही हसन मुश्रीफ यांच्यासाठी मनी लाँड्रिंगचे काम केले आहे’ असा आरोप करत, त्यांना २० लाख रुपये खात्यात जमा करण्यास भाग पाडले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, व्यास यांनी पुणे येथे तक्रार दाखल केली.

मंत्री मुश्रीफ यांनी या घटनेवर प्रतिक्रिया देताना सांगितले की, अशा घटना वारंवार होत असताना सायबर क्राइम विभाग आणि राज्य शासन यावर काय उपाययोजना करत आहेत? त्यांनी सायबर गुन्हेगारांना कडक शिक्षा होण्याची अपेक्षा व्यक्त केली आणि अशा फसवणुकीच्या घटनांवर अंकुश लावण्यासाठी प्रभावी पावले उचलण्याची मागणी केली आहे.

हेही वाचा :

उत्तर रेल्वे भरती २०२४: ४०९६ रिक्त जागांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू – जाणून घ्या संपूर्ण तपशील

लाडकी बहीण योजना निवडणुकीनंतर सुरु राहील का? महायुती सरकारमधील मंत्र्यांनी केलं मोठं वक्तव्य

इचलकरंजीतून राहुल आवाडेच उमेदवार! हातकणंगले आणि शिरोळमधूनही……