रांची : लोकसभा निवडणुकीनंतरही देशातील राजकारणात(Assembly) अद्याप अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. यापूर्वी कर्नाटकात जेडीएस आणि भाजपमध्ये मतभेद पाहिला मिळाले तर आता झारखंडमध्ये मोठी घडामोड पाहिला मिळत आहे. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यावर आश्वासनाचा भंग केल्याचा आरोप करणाऱ्या भाजपच्या तब्बल 18 आमदारांना विधानसभेतून थेट निलंबितच करण्यात आले.
झारखंड विधानसभेचे (Assembly)अध्यक्ष रवींद्रनाथ महतो यांनी विरोधी आमदारांकडून सभागृहात गोंधळ घातल्यामुळे ही कारवाई करण्यात आली. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी रोजगारासह विविध प्रश्नांवर उत्तरे देण्यास नकार दिला होता. याच विरोधात भाजप आमदार बुधवारी आसनासमोर निदर्शने करत होते.
विरोधी पक्षनेते अमर बौरी यांनी झारखंडमध्ये हुकूमशाही असल्याचा आरोप केला. सभागृहाचे कामकाज सुरू होण्यापूर्वी भाजप आमदारांनी खुर्चीजवळ येऊन मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या राजीनाम्याची मागणी करत घोषणाबाजी केली.
दरम्यान, या गोंधळानंतर विधानसभा अध्यक्ष महतो यांनी आंदोलन करणाऱ्या भाजपच्या 18 आमदारांना निलंबित केले आहे. या सर्व आमदारांना अध्यक्षांनी निलंबित केल्याने राजकीय स्तरावर चर्चांना उधाण आले आहे.
अनन्त कुमार ओझा, रणधीर कुमार सिंह, नारायण दास, अमित कुमार मंडल, डॉ. नीरा यादव, गुन कुमार दास, केदार हाजरा, बिरंची नारायण, अर्पण सेन गुप्ता, डॉ. राज सिन्हा, कोचे मुण्डा, भानु प्रताप शाही, समरी लाल, चन्द्रे वर प्रसाद सिंह, नवीन जयसवाल, डॉ. कुशावाहा शशि भूशण मेहता, आलोक कुमार चौरसिया आणि पुष्पा देवी या आमदारांचा समावेश आहे.
या प्रस्तावावर सभापती रवींद्रनाथ महतो म्हणाले की, ‘विशेषाधिकारांच्या बाबतीत सभागृह सर्वोच्च आहे. भाजप सदस्यांचे वर्तन असभ्य आहे. अशा स्थितीत त्यांना 2 ऑगस्टच्या दुपारपर्यंत निलंबित करण्यात आले आहे. आता भाजपच्या या 18 आमदारांची आचार समिती चौकशी करणार आहे’.
हेही वाचा :
हिना खानने काढले डोक्यावरील केस व्हिडीओ शेअर करत झाली इमोशनल
हात पकडून मुलीला I love you म्हणाला, दोन वर्षाचा तुरुंगवास
‘तो चांगला खेळाडू असेल पण त्याने माझ्यासोबत वाईट केलं!’ अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा