मेटा कंपनीच्या मालकीच्या इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपने जून २०२५ मध्ये (accounts)भारतात तब्बल ९८ लाखांहून अधिक अकाउंट्स निलंबित केले आहेत. प्लॅटफॉर्मवरील गैरवापर थांबवणे आणि यूजर्सच्या सुरक्षिततेसाठी हे मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. यामध्ये विशेष बाब म्हणजे यातील जवळपास १९ लाख अकाउंट्सवर यूजर्सकडून कोणतीही तक्रार न येताच व्हॉट्सअॅपने स्वतःहून कारवाई केली.

व्हॉट्सअॅपच्या मासिक अनुपालन अहवालानुसार, जून महिन्यात कंपनीला एकूण २३,५९६ तक्रारी प्राप्त झाल्या. या तक्रारी मुख्यतः अकाउंट सपोर्ट, बॅन अपील आणि तांत्रिक (accounts)अडचणींशी संबंधित होत्या. या तक्रारींचे सखोल परीक्षण केल्यानंतर १,००१ प्रकरणांमध्ये तात्काळ कारवाई करण्यात आली.
व्हॉट्सअॅपने प्लॅटफॉर्मवरील स्पॅम, फेक न्यूज आणि इतर गैरवापराच्या घटनांना रोखण्यासाठी त्यांच्या सुरक्षा प्रणालीत सातत्याने सुधारणा केल्या आहेत. कंपनीचा विश्वास आहे की, समस्यांचा सामना होण्यापूर्वीच प्रतिबंधात्मक पावले उचलणे अधिक महत्त्वाचे आहे. त्यामुळे प्रगत तंत्रज्ञान आणि यूजर्सच्या फीडबॅकच्या आधारे व्हॉट्सअॅपची सुरक्षा यंत्रणा अधिक प्रभावी बनवली जात आहे.
व्हॉट्सअॅपची गैरवापर प्रतिबंधक प्रणाली यूजर्सच्या अकाउंट जीवनचक्रातील तीन महत्त्वाच्या टप्प्यांवर लक्ष ठेवते, नोंदणीच्या वेळी, संदेश पाठवताना आणि नकारात्मक फीडबॅक प्राप्त झाल्यानंतर. या प्रक्रियेसाठी स्वयंचलित यंत्रणांबरोबरच तज्ञांची टीम काम करत असते, जे विशेष प्रकरणांचा सखोल आढावा घेऊन सिस्टमची अचूकता वाढवतात.

या कारवाईतून व्हॉट्सअॅपच्या सुरक्षिततेबाबतच्या कटिबद्धतेची झलक मिळते. प्लॅटफॉर्मवरील गैरवापर, स्पॅम आणि हानिकारक क्रियाकलाप थांबवण्यासाठी कंपनी कठोर पावले उचलत आहे, जेणेकरून यूजर्सना निर्भय आणि सुरळीत संवादाचा अनुभव घेता येईल. अशा उपाययोजनांमुळे प्लॅटफॉर्मवरील एकंदर यूजर्स अनुभव अधिक सुरक्षित आणि विश्वासार्ह होण्याची अपेक्षा आहे.(accounts)या कारवाईतून व्हॉट्सअॅपच्या सुरक्षिततेबाबतच्या कटिबद्धतेची झलक मिळते. प्लॅटफॉर्मवरील गैरवापर, स्पॅम आणि हानिकारक क्रियाकलाप थांबवण्यासाठी कंपनी कठोर पावले उचलत आहे, जेणेकरून यूजर्सना निर्भय आणि सुरळीत संवादाचा अनुभव घेता येईल. अशा उपाययोजनांमुळे प्लॅटफॉर्मवरील एकंदर यूजर्स अनुभव अधिक सुरक्षित आणि विश्वासार्ह होण्याची अपेक्षा आहे.
हेही वाचा :
सासऱ्याने केली अशी गोष्ट… वर्षा उसगांवकर यांच्या खासगी आयुष्यात अनेक वादळ
आता मराठा आरक्षण मिळवल्याशिवाय फेटा बांधणार नाही, मनोज जरांगे पाटील यांचं आव्हान
आम्ही तुम्हाला डिजीटल अरेस्ट करतोय, एक व्हिडीओ कॉल आणि… नाशिकमध्ये त्या चार लोकांसोबत काय घडलं?