कागलमध्ये विधानसभेचं वारं; महायुतीतच ‘बिग फाईट’, घाटगे-मुश्रीफ लागले कामाला…

लोकसभेचा निकाल 4 जूनला लागल्यानंतर विधानसभेचे वारं राज्यात(political news today) वाहणार आहे. अशातच राज्यात झालेले सत्ताबदल आणि मनोमिलन झालेल्या नेत्यांसमोर विधानसभेला प्रत्येक मतदारसंघात कोणाला उमेदवारी द्यावी, याचं महासंकट उभे राहणार आहे. महाविकास आघाडी असो व महायुतीतील इच्छुक या सर्वांना विश्वासात घेऊनच उमेदवारीवर शिक्कामोर्तब करावे लागणार आहे. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून आमदारकीचा स्वप्न असलेल्या कार्यकर्त्यांना देखील आपल्या मेहनतीवर पाणी जाऊ नये, यासाठी देखील बंडाची तयारीही ठेवली आहे.

राज्यात सर्वाधिक चर्चेत असलेला कागल विधानसभा मतदारसंघही(political news today) त्याच उंबरठ्यावर आहे. महाविकास आघाडीतील नेत्यांची कमतरता असताना महायुतीतील नेत्यांना मात्र हा मतदारसंघ अडचणीचा ठरणार आहे. भविष्यात महायुती स्वतंत्र लढेल की एकत्र लढेल हे सांगणे आत्ताच कठीण असले तरी पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि भाजपचे नेते समरजित घाटगे यांनी स्वतंत्रपणे विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला आत्तापासूनच सुरुवात केली आहे. समाज माध्यमांवर त्याची झलक आत्तापासूनच कार्यकर्त्यांना दिसू लागली आहे.

सध्या महायुतीत असणारे राष्ट्रवादीचे नेते आणि कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि भाजपचे नेते शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजीत सिंह घाटगे यांनी लोकसभेला एकत्र येत खासदार संजय मंडलिक यांच्या प्रचारात भाग घेतला. मागील पाच ते सहा वर्षांचा कालावधी पाहता पालकमंत्री मुश्रीफ आणि घाटगे यांच्यात राजकीय वैर चांगलेच उफाळून आले आहे. मात्र लोकसभा निवडणुकीला समझोता एक्सप्रेस धावल्यानंतर आता विधानसभा निवडणुकीत स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. या दोघांनीही प्रचाराला सुरुवात केली असून समाज माध्यमावर त्याची झलक सध्या कार्यकर्त्यांसह अनेक मतदारांना बघायला मिळत आहे.

राष्ट्रवादी महायुतीत सहभागी झाल्यानंतर समरजीत घाटगे काही काळ भाजपच्या वरिष्ठ नेत्यांवर नाराज होते. मात्र ही नाराजी दूर करण्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यश आले. त्याचवेळी घाटगे यांनी माझे राजकारणातील गुरु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आहेत. मुश्रीफ यांचा पराभव करूनच विधानसभा जिंकेल, अशी गर्जना त्यांनी केली होती. सध्या लोकसभेच्या निकालानंतर विधानसभेचे वारे जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघात वाहणार आहे. त्यानिमित्ताने घाटगे आणि मुश्रीफ यांच्या समाज माध्यमातील चित्रफीत आगामी विधानसभा निवडणुकीची चुरस दाखवून देत आहेत.

गेल्या काही दिवसांपूर्वी पालकमंत्री हसन मुश्रीफ आपल्या समाज माध्यमांच्या अकाउंटवर ऍक्टिव्ह झाले आहेत. कागलचा श्रावण बाळ म्हणून ओळख असणाऱ्या मुश्रीफ यांनी आरोग्य क्षेत्रात गोरगरिबांना मदत करण्याची भूमिका सातत्याने ठेवली आहे. जनता दरबारच्या निमित्ताने त्यांचा गावोगावी असलेला संपर्क महत्त्वाचा मानला जातो. रुग्णांना मदत करणे हाच सेवाधाम मानून त्यांचे कार्य अविरतपणे सुरू असल्याची माहिती देणारी चित्रफीत त्यांनी काही दिवसांपूर्वी इंस्टाग्रावर पोस्ट केली होती. सध्या त्याची चर्चा जोरात सुरू आहे.

दुसरीकडे समरजीत घाटगे यांनी मतदारांना प्रत्यक्षात भेटणे, त्यांच्या अडीअडचणी समजून घेणे, आरोग्य विषयात कार्यकर्त्यांसह मतदारांना मदत करणे असे कार्य सुरू ठेवले आहे. त्यातूनच मागील काही दिवसात 100 वर्षे आजीचा केलेला वाढदिवस, कार्यकर्त्यांच्या कुटुंबांची रुग्णालयात जाऊन चौकशी करणे हाच धागा पकडत त्यांनी सर्वसामान्यांची नाळ धरून ठेवली आहे. त्या संदर्भातील काही व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाले आहेत.

सध्या या मतदारसंघात महाविकास आघाडीकडे प्रबळ उमेदवार नसला तरी महायुतीतील हे दोघे प्रबळ उमेदवार यांच्यातच ईर्षा सुरू झाली आहे. लोकसभेचे गणित सुटलं नाही तोवर विधानसभेची आकडेमोड या मतदारसंघात सुरू झाल्याने पुढील काळात राजकीय गणितं सोडवताना वरिष्ठांना नाकीनऊ येणार, हे नक्की.

हेही वाचा :

इचलकरंजीमध्ये नेत्याच्या विरोधात बोलणाऱ्याला धू धू धुतले

दिवाळीआधी राज्याला मिळणार नवं सरकार; ‘या’ तारखांना विधानसभेचं मतदान?

शाहरुखने गंभीरला दिला ब्लँक चेक! IPL ची ट्रॉफी जिंकण्याआधीच चेक देत म्हणाला…