शिराळा : ‘‘मी नेता म्हणून नव्हे; तर शेतकऱ्यांचा कार्यकर्ता म्हणून राजू शेट्टी यांच्या प्रचाराला(active campaign) आलोय. कोणी म्हणतो हिंदू संकटात आहे, तर कोणी मुस्लिम. हिंदू वा मुस्लिम संकटात नाहीत तर शेतकरी, कष्टकरी, मजूर संकटात आहेत. जात व धर्म एकत्र आणल्याशिवाय सत्ताधाऱ्यांना निवडून येता नाही. हिंदू मुस्लिम आतंकवाद वाढत चालल्याचे काँग्रेस व भाजपवाले म्हणताहेत. पण राजकारणाचा आतंकवाद सुरू आहे. तो शेतकऱ्यांविरोधात आहे. जातीपलीकडे जाऊन संघटना मजबूत करावी,’’ असे प्रतिपादन आमदार बच्चू कडू यांनी केले.
शिराळा येथे हातकणंगले लोकसभा मतदार(active campaign) संघाचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार राजू शेट्टींच्या प्रचार सभेत ते बोलत होते. कडू म्हणाले, ‘‘आमचे तिकीट गावातून पक्के होते. त्यांचे दिल्ली-मुंबईतून. हाच त्यांच्यात व आमच्यात फरक आहे. हक्क हवा असेल तर व्यवस्थेविरोधात लढायला शिका. निवडणुका आल्यावर जातीचं राजकारण पेरलं जातं. शेतकऱ्यांसाठी लढणारे कोणी नाहीत. आमच्यावर शेतकऱ्यांचा दबाव राहील. गरिबांना सर्व उशिरा दिले जाते. जातधर्माच्या नावावर कमजोर केले आहे. म्हणून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलणाऱ्या शेट्टींना लोकसभेत पाठवा.’’
शेट्टी म्हणाले, ‘‘गतवेळी बेसावध होतो. आता चूक करणार नाही. म्हणून स्वतंत्र उभा राहिलो. माझ्या पराभवासाठी पंतप्रधान, मुख्यमंत्री व अन्य दिग्गज आले त्यांना एकटा पठ्ठा भारी आहे. हा अहंकार व घमेंड नाही तर माझ्यामागे करपलेले चेहरे आणि त्यांची ताकद आहे. विरोधकांच्या सभेला भाड्याने लोक आणावे लागतात. आता पैशांचा पाऊस पडेल. सुरत लुटीचा अड्डा होता. सुरतेचा खजिना लुटा. सामान्य माणूसच विरोधकांची पैशांची मस्ती उतरून टाकेल. कितीही पैसा उधळला तरी मीच निवडून येणार. मुख्यमंत्री शिंदेंनी अडवलेला शेतकऱ्यांचा पैसा निवडणुकीनंतर वसूल केल्याशिवाय सोडणार नाही.’’
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राम पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप, प्रहार तालुकाध्यक्ष बंटी नांगरे-पाटील, जालिंदर पाटील, तात्या बालवडकर, सौरभ शेट्टी, अतुल दिघे, कैलास देसाई, संदीप राजोबा, देवेंद्र धस, सूर्यकांत जाधव, आनंदराव पाटील, सुनील पाटील, मानसिंग पाटील, राजू शेळके, जनार्दन पाटील, अनुसया पाटील, सुनीता कांबळे, जयश्री पाटील, राजू शिंदे, रवी पाटील, अजिंक्य कोळी, अवधूत नांगरे, अॅड. गौस मुजावर, अमर कदम, सूर्यभान जाधव आदी उपस्थित होते.
हेही वाचा :
हार्दिककडून पुन्हा टॉस फिक्सिंग? Live कॅमेरात कैद झाली पंड्याची चिटींग?
धक्कादायक आता आणखी एका ठिकाणी काँग्रेस उमेदवाराचा निवडणूक लढण्यास नकार