अमरावतीत होणार तिरंगी लढत! बच्चू कडूंच्या उमेदवारामुळं महायुती की मविआचा होणार गेम?

मुंबई : अमरावती लोकसभा मतदारसंघ(political strategist) हा विदर्भातील एक महत्वाचा मतदारसंघ आहे जिथं नवनीत राणा विरुद्ध बळवंत वानखडे असा महायुती विरुद्ध महाविकासआघाडी यांच्यात सामना होणार आहे. पण या दोन उमेदवारी जाहीर झाल्यानंतर इथं प्रहार संघटनेच्या बच्चू कडूंच्या उमेदवाराची एन्ट्री झाली आहे.

दिनेश बूब यांना प्रहार संघटनेचा उमेदवार(political strategist) म्हणून घोषित केलं आहे. त्यामुळं अमरावती लोकसभेची निवडणूक यंदा चांगलीच चुरशीची होऊ शकते. राणांविरुद्ध रिंगणात उतरलेले दिनेश बूब नेमके कोण? हे जाणून घेऊयात.

नवनीत राणा आणि रवी राणा हे अमरावतीतलं हे दाम्पत्य सध्या सर्वच राजकीय पक्षांच्या डोळ्यात खुपतं आहे. कारण, ज्या पक्षानं राणांना उमेदवारी दिली, त्याच राणांच्या कार्यकर्त्यांनीच भाजप कार्यालयाची तोडफोड केली होती. त्यावरुन नुकतंच बच्चू कडूंनी भाजपवर घणाघाती टीकाही केली होती.

दुसरीकडे हनुमान चालिसा पठण प्रकरणावरुन याच राणांनी थेट ठाकरेंशी पंगा घेतला होता. अशातच सन २०१९ला नवनीत राणा राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर खासदार म्हणून निवडून आल्या. पण आता या राणांना महायुतीतीलच शिंदेंच्या शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी आणि अपक्ष आमदार बच्चू कडूंनी उघड उघड विरोध केला आहे. यामुळं कडू यांचे उमेदवार दिनेश बूब चर्चेत आले आहेत.

दिनेश बूब यांची कट्टर शिवसैनिक अशी ओळख आहे. सर्वांशी जुळून घेऊन काम करण्यात त्यांची हातोटी आहे. प्रहार संघटनेत प्रवेश करण्याआधी ते ठाकरेंचे निष्ठावंत शिवसैनिक होते. अमरावती महापालिकेत ते चार वेळा नगरसेवक राहिले आहेत. 2002 ते 2007 या काळात त्यांनी आमरावतीत शिवसेनेचे स्वीकृत नगरसेवक म्हणून काम केलं आहे. 2007 ते 2012 श्रीकृष्ण पेठ, अमरावती (शिवसेना), 2012 ते 2017 अंबापेठ, अमरावती (अपक्ष), 2017 पासून जवाहर स्टेडीयम, अमरावती (अपक्ष) म्हणून ते निवडून आले आहेत.

अमरावती लोकसभा मतदारसंघाबाबत सांगायचं झाल्यास, महायुतीत ही जागा भाजपकडे, महाविकासआघाडीत ही जागा काँग्रेसकडे गेली आहे. पण, हा मतदारसंघ परंपरागत शिवसेनेचा मतदारसंघ आहे. त्यामुळे यंदा ही जागा शिवसेनेला मिळावी अशी शिंदे आणि ठाकरे दोन्ही बाजूंच्या शिवसैनिकांची इच्छा होती.

परंतु, महायुती आणि महाविकासआघाडी दोन्हीकडून शिवसेनेच्या हातून ही जागा गेली आहे. त्यामुळे ठाकरेंशी एकनिष्ठ आणि निष्ठावंत राहिलेल्या दिनेश बूब यांना उमेदवारी देण्याचा निर्णय प्रहार संघटनेनं घेतला आहे. त्यासाठी दिनेश बूब यांनीही शिवसेनेची साथ सोडून प्रहार संघटनेत प्रवेश केला आणि आता ते प्रहार संघटनेकडून लोकसभेच्या रिंगणात उतरणार आहेत.

दिनेश बूब यांच्या एका उमेदवारीचा महायुती आणि महाविकासआघाडी दोन्हींवर परिणाम होणार, असं प्राथमिक चित्र आहे. कारण, अमरावतीतील दोन मतदारसघ मेळघाट आणि अचलपूर जिथून प्रहारचे अनुक्रमे राजकुमार पटेल आणि बच्चू कडू आमदार आहेत. तिथे दिनेश बूब यांना बच्चू कडूंची मदत होईल, असं दिसतंय.

पण, संपूर्ण लोकसभा मतदारसंघात ते कितपत भारी पडतील, हे आता सांगणं तरी कठीण आहे. कारण आता तरी त्यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. पण भाजप उमेदवाराला जिंकून आणण्यासाठी देवेंद्र फडणवीस इथे शिष्टाई करणार का? आणि दिनेश बूब यांची उमेदवारी मागे घेऊन त्यांच्या शिष्टाईला फळ येणार का? हे चित्र येत्या काही दिवसात स्पष्ट होईल.

हेही वाचा :

राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढणार भाजप आमदाराची पत्नी

लोकसभा निवडणुकीत मतदान न केल्यास बँकेतून 350 रुपये कापले जातील? 

सर्वांसमोर ऋषि कपूर यांनी रणबीरच्या कानशीलात लागावली; कारण ठरली ‘ही’ धार्मिक चूक