खरंच परिणीती चोप्रा प्रग्नेंट आहे का?, अभिनेत्रीने VIDEO शेअर करत सांगितलं सत्य

बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा तिच्या(getting pregnant) आगामी ‘अमरसिंग चमकीला’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात परिणीतीसोबत पंजाबी सिंगर आणि अभिनेता दिलजीत दोसांझ मुख्य भूमिकेत आहे. दिलजीतने अमरसिंग चमकीला यांची भूमिका साकारली आहे. तर परिणीती चोप्राने त्याची पत्नी अमरजोत कौरची भूमिका साकारत आहे.

सध्या परिणीती आणि दिलजीत या चित्रपटाच्या(getting pregnant) प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च इव्हेंटवेळी परिणीती चोप्राने कफ्तान ड्रेस घालला होता. त्यानंतर सोशल मीडियावर अभिनेत्री प्रेग्नंट असल्याच्या अफवा येऊ लागल्या. प्रेग्नेंसिच्या चर्चेदरम्यान आता परिणीती चोप्राने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर करत या सर्व अफवांना पूर्णविराम दिला आहे.

परिणीती चोप्राने तिच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कफ्तान ड्रेस परिधान केला होता आणि त्याचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. यासोबतच तिने प्रेग्नेंसी बातमी निव्वळ अफवा असल्याचेही स्पष्टपणे सांगितले आहे. परिणीती चोप्राने आपल्या अधिकृत इन्स्टाग्रामवर सुंदर आणि फिट व्हाईट आउटफिट घातला आहे. यानंतर तिने तिच्या ब्लॅक कलरचा कफ्तान ड्रेसचा फोटो शेअर केला. ज्यामध्ये तिने वेगवेगळ्या मीडिया साइट्सवर तिच्या प्रग्नेंसी बातम्यांचे कटिंग शेअर केले.

हा व्हिडिओ शेअर करताना परिणीती चोप्राने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘फिट कपड्यांच्या युगात प्रवेश करत आहे.’ या व्हिडिओमध्ये परिणीतीने परिधान केलेला फिट आउटफिट हा पांढऱ्या रंगाचा पॅन्टसूट आहे. दोन दिवसांपूर्वी परिणीती चोप्राने प्रेग्नेंसीच्या बातमीवर प्रतिक्रिया दिली होती. तिने तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये लिहिले होते, ‘काफ्तान ड्रेस = प्रेग्नेंसी, ओव्हरसाइज शर्ट = प्रेग्नेंसी, आरामदायक भारतीय कुर्ता = प्रेग्नेंसी.’

चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च कार्यक्रमात चित्रपटाचे दिग्दर्शक इम्तियाज अली यांनी खुलासा केला होता की, ‘त्याने परिणीती चोप्राला तिचे वजन 10 किलो वाढवण्यास सांगितले होते. इम्तियाज अली म्हणाले की, ‘परिणिती म्हणाली की ती एक चित्रपट करण्यासाठी 5 वर्षांपासून वाट पाहत आहे ज्यामध्ये ती गाणं गाऊ शकते.’ परिणीतीने चित्रपटासाठी होकार दिला. यानंतर आमच्या लक्षात आले की, परिणतीचा आकार अमरजोतसारखा नाही. मग मी म्हणालो – खूप सोपे काम आहे.’, समोसे, मलाई, चाट… हे सर्व खाणे सुरू कर. मग तुझे वजन 10 किलो वाढेल. कोणतीही मुलगी हे करू शकत नाही आणि कोणताही मुलगा हे करू शकत नाही.’

हेही वाचा :

राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढणार भाजप आमदाराची पत्नी

लोकसभा निवडणुकीत मतदान न केल्यास बँकेतून 350 रुपये कापले जातील? 

अमरावतीत होणार तिरंगी लढत! बच्चू कडूंच्या उमेदवारामुळं महायुती की मविआचा होणार गेम?