भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात 5 सामन्यांची टेस्ट सीरिज खेळवण्यात येणार असून याकरता टीम इंडियाचा(Team India) संघ इंग्लंड दौऱ्यावर गेलाय. 20 जून पासून या संघांमध्ये पहिला टेस्ट सामना खेळवला जाणार असून या सामन्याला केवळ 1 दिवस शिल्लक असताना टीम इंडियाचा गोटातून एक वाईट बातमी समोर आलीये. मागील 18 वर्षांमध्ये भारताला इंग्लंडमध्ये एकही टेस्ट सीरिज जिंकण्यात यश आलेलं नाही. तेव्हा यंदातरी टीम इंडिया हा दुष्काळ संपवेल अशी आशा असताना संघातील मॅच विनर खेळाडूला दुखापत झाल्याची माहिती समोर येत आहे.

मॅच विनर खेळाडूला दुखापत :
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पहिला सामना यॉर्कशायर क्रिकेट ग्राउंडवर होणार आहे. यासाठी दोन्ही संघ मैदानात सराव करत असताना टीम इंडियाचा(Team India) खेळाडू करुण नायरला दुखापत झाली आहे. फलंदाजीचा सराव करत असताना प्रसिद्ध कृष्णाने टाकलेला एक बॉल करुणच्या बरगड्यांजवळ लागला. यानंतर करुण वेदनेनं कळवळताना दिसला. सपोर्ट स्टाफ आणि संघातील काही सदस्य त्याच्याजवळ गेले त्याचं निरीक्षण केलं. यावेळी करुण नायर मेडिकल स्टाफला त्याच्या शरीरावर कुठे बॉल लागला हे दाखवताना दिसला. काही वेळाने करुण नायरने पुन्हा एकदा सरावाला सुरुवात केली, मात्र त्याला झालेल्या दुखापतीने टीम इंडियाचं टेन्शन वाढलं.
स्टार फलंदाज करुण नायरने 2017 मध्ये भारतीय संघासाठी शेवटचा सामना खेळला होता. त्यानंतर त्याला जवळपास 8 वर्ष टीम इंडियात खेळवण्याची संधीच मिळाली नव्हती. मात्र 20 जून पासून सुरु होणाऱ्या भारताच्या इंग्लंड टेस्ट दौऱ्यासाठी 33 वर्षीय करुण नायरला संधी देण्यात आलीये. मागील अनेक वर्षांपासून देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करून सुद्धा करुण नायरला टीम इंडियात(Team India) खेळण्याची संधी मिळत नव्हती. त्यावेळी अनेकांनी त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन लीग स्टेज सामने खेळवण्याचा सल्ला सुद्धा दिला होता, मात्र करुणने हार मानली नाही.
भारत विरुद्ध इंग्लंड टेस्ट सीरिजपूर्वी भारत अ आणि इंग्लंड लायन्स या संघांमध्ये 29 मे पासून पहिला अनऑफिशियल टेस्ट सामना खेळवला गेला. सामन्याच्या दुसऱ्याच दिवशी करुण नायरने तब्बल 204 धावांची खेळी करून इंग्लंडच्या गोलंदाजांना घाम फोडला. हे द्विशतक ठोकत असताना करुण नायरने 26 चौकार आणि 1 षटकार ठोकला. या फलंदाजाने 281 चेंडूंचा सामना केला आणि 72 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली. आता तो 20 जून पासून सुरु होणाऱ्या इंग्लंड सीरिजमध्ये कसा परफॉर्मन्स देतो हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे.
इंग्लंड टेस्ट सीरिजसाठी भारतीय संघ :
शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार आणि विकेटकीपर), यशस्वी जयसवाल, केएल राहुल, साई सुदर्शन, अभिमन्यु ईश्वरन, करुण नायर, नितीश रेड्डी, रवींद्र जड़ेजा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), वाशिंगटन सुंदर, शार्दुल ठाकुर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आकाश दीप, अर्शदीप सिंह, कुलदीप यादव.
भारत विरुद्ध इंग्लंड टेस्ट सीरिज वेळापत्रक :
भारत विरुद्ध इंग्लंड पहिला सामना : 20 ते 24 जून
भारत विरुद्ध इंग्लंड दुसरा सामना : 2 ते 6 जुलै
भारत विरुद्ध इंग्लंड तिसरा सामना : 10 ते 14 जुलै
भारत विरुद्ध इंग्लंड चौथा सामना : 23 ते 27 जुलै
भारत विरुद्ध इंग्लंड पाचवा सामना : 31 जुलै ते 4 ऑगस्ट
हेही वाचा :
नागरिकांनो सतर्क राहा! राज्यात पावसाचा ‘हायअलर्ट’ जारी
टी20 वर्ल्डकप 2026 चं वेळापत्रक जाहीर, या दिवशी होणार भारत पाकिस्तान सामना