मुंबई : विधानसभा निवडणुकांची अद्याप घोषणा झाली नसली तरी कोणत्याही क्षणी निव़डणुकांची घोषणा होऊ शकते. त्यामुळे महाविकास आघाडी आणि महायुतीने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. पण दुसरीकडे महाविकास घाडीत मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावरूनही जोरदार रस्सीखेच सुरू असल्याचे दिसत आहे. अशातच काँग्रेसचे(Congress) ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्रीपदाबाबत केलेल्या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (19 सप्टेंबर) मीरा- भाईंदर येथे काँग्रेसच्या(Congress) कोकण विभाग जिल्हा आढावा बैठक पार पडली., या बैठकीत बाळासाहेब थोरात यांनी महाविकास आघाडीतील मुख्यमंत्रीपदाबाबत प्रश्न विचारण्यात आला.यावेळी बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले, “महाराष्ट्रातील जवळपास सर्व बैठका आता शेवटच्या टप्प्यात आल्या आहेत.
संपूर्ण राज्यात काँग्रेसला, महाविकास आघाडीला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. विशेष म्हणजे आगामी निवडणुकीत महाराष्ट्रा महाविकास आघाडीला मोठ्या प्रमाणात जागा मिळतील, असे दिसत आहे. महाराष्ट्रात काँग्रेसचा मुख्यमंत्री व्हावा, अशी आमचीही इच्छा आहे. त्यात आश्चर्य व्यक्त करण्याचे कारण नाही. पण हा अधिकार प्रत्येक पक्षाला आहे.
बाळासाहेब थोरात म्हणाले, महायुतीला सत्तेचा अहंकार झाला आहे. सर्वसामान्य जनतेला चिरडून टाकण्याची भाषा सत्ताधारी पक्षातील नेत्यांचेच नातेवाईक करत आहेत. महायुतीचे हे सरकार भ्रष्ट मार्गाने आले आहे, पण आजही तळागाळातील वाड्या वस्त्यावर 50 खोके एकदम ओके, हे विसरलेले नाहीत”, असे म्हणत थोरातांनी महायुतीवर निशाणा साधला.
या बैठकीला केंद्रीय प्रभारी रमेश चेन्नीथाल, काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पाटोले, बाळासाहेब थोरात, सतेज पाटील, हुसेन दलवाई शाह भाई जगताप हे प्रमुख नेतेही उपस्थित होते. यावेळी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.
नाना पटोले म्हणाले, भाजप घाबरलेला पक्ष आहे. लोकसभेला ते चारशे पार करणार होते. पण ते बहुमत मिळवू शकले नाही. राहुल गांधींना वाढता प्रतिसाद पाहून आता भाजपची हवाच गूल झाली हे. राहुल गांधींना ठार मारण्याची धमकी ते देत आहेत. पण आता हे सरकार सत्तेच्या बाहेर जाणार आहे. हरियाणा आणि जम्मू काश्मीरमध्ये आमचे सरकार येणार आहे. म्हणून ते घाबरलेले आहेत. असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
भारतीय जनता पक्षावर जोरदार निशाणा साधला. भाजप घाबरलेला पक्ष आहे, जो चारशे पार करणार होते ते बहुमत मिळवू शकलेले नाहीत. राहुल गांधी यांच्याबाबत वाढता प्रतिसाद बघता भाजपची हवा गूल झाली आहे, राहुल गांधी यांना ठार मारण्याची धमकी देत आहेत, असे म्हणत हे सरकार सत्तेच्या बाहेर जाणार आहे. हरियाणा आणि जम्मु काश्मीरमध्ये आमची सरकार येणार म्हणून घाबरलेले आहेत, असा घणाघात नाना पटोले यांनी केला.
हेही वाचा:
मोबाईल ग्राहकांना फटका? टेलिकॉम कंपन्यांना सुप्रीम कोर्टाचा झटका
“लॉरेन्स बिश्नोई को भेजू क्या”; सलमान खानच्या वडिलांना का दिली धमकी
सिंघममध्ये होणार दबंग एन्ट्री! ‘सिंघम अगेन’मध्ये दिसणार चुलबुल पांडेच्या भूमिकेत?