मुंबई : फुल उत्पादक शेतकऱ्यांना(Farmers) योग्य भाव मिळावा आणि त्यांच्या हिताला धक्का पोहोचवणाऱ्या कृत्रिम फुलांवर तातडीने बंदी आणावी, अशी ठाम मागणी आमदार रोहित आर. आर. पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

या मागणीला राज्यातील १०५ आमदारांचे समर्थन लाभले असून, त्या अनुषंगाने पाठिंबा पत्र मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आले. या मागणीमागील उद्देश फक्त शेतकऱ्यांचे आर्थिक हित जपणे नव्हे, तर नागरिकांच्या आरोग्यावर आणि पर्यावरणावर होणारा प्रतिकूल परिणामही रोखणे हा आहे.
आमदार पाटील यांनी स्पष्ट केले की, कृत्रिम फुलांची वाढती विक्री नैसर्गिक फुलांच्या मागणीवर परिणाम करत असून, त्याचा थेट फटका ग्रामीण भागातील फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांना(Farmers) बसतो आहे. त्यामुळे त्यांचे उत्पन्न घटते आहे आणि या क्षेत्रात निराशा पसरत आहे.

या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत तातडीने उच्चस्तरीय बैठक बोलावून ठोस निर्णय घेण्यात यावा, अशी जोरदार मागणी आमदार पाटील यांनी केली आहे.
राज्य शासनाने या विषयाची गंभीर दखल घेऊन शेतकऱ्यांना न्याय देणारे निर्णय घ्यावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
हेही वाचा :
गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांना दिलासा! 5000 जादा एसटी बसेसची घोषणा
पोस्टमन मामा या दिवशी येणार नाहीत — 21 जुलै रोजी पोस्ट ऑफिसचे व्यवहार बंद राहणार