आंध्र प्रदेश येथील भगवान व्यंकटेश्वराचे तिरुपती तिरुमला बालाजी मंदिर जगप्रसिद्ध आहे. मात्र तिरुपती व्यंकटेश्वर मंदिराच्या प्रसादात भेसळ झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रसाद बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या तुपात गोमांस(animals), डुकराची चरबी आणि फिश ऑईल आढळून आल्याने सर्वानाच धक्का बसला आहे.
यासंदर्भात सत्ताधारी तेलुगु देसम पक्षाने दावा केला आहे की, गुजरात येथे असलेल्या पशुधन (animals)प्रयोगशाळेने या भेसळीची पुष्टी केली आहे. यावेळी प्रसाद म्हणून वाटण्यात येणारे लाडू बनवण्यासाठी चक्क गोमांस चरबी, फिश ऑईल व पाम ऑइलचा वापर केला जात असल्याचं टीडीपी पक्षाने म्हटलं आहे. दरम्यान, आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी यासंदर्भात सनातन धर्म रक्षा मंडळ स्थापन करण्याची मागणी केली आहे.
तसेच प्रसादाच्या लाडूत चरबी आढळून आल्यानंतर देशभरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, तिरुपती देवस्थान समितीचे देवस्थान समिती सदस्य मिलिंद नार्वेकर यांनी या वादावर अवघ्या एका वाक्यात प्रतिक्रिया दिली आहे.
या संपूर्ण प्रकरणावर माहिती देताना देवस्थान समिती सदस्य मिलिंद नार्वेकर म्हणाले की, मला यासंदर्भात कसलीही माहिती नाही. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे स्वीय सचिव आणि अत्यंत निकटवर्तीय असलेल्या मिलिंद नार्वेकर यांनी ऑक्टोबर 2021 मध्ये तिरुमला तिरुपती देवस्थानम (TTD) चे सदस्य म्हणून शपथ घेतली होती.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मिलिंद नार्वेकर यांच्या नावाची शिफारस केल्यानंतर आंध्र प्रदेशचे तत्कालिन मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांनी मिलिंद नार्वेकर यांची टीटीडी सदस्य म्हणून नियुक्ती केली होती. तसेच आंध्र प्रदेश सरकारने TTD मध्ये तब्बल 24 सदस्यांची नियुक्ती केली आहे. त्यामध्ये मिलिंद नार्वेकर हे महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे नेते आहेत.
हेही वाचा:
राज्यातील तिसरी आघाडी कुणावर “प्रहार” करणार ?
निकी तांबोळी स्टाइल ‘बाईssss…’ म्हणत सुषमा अंधारेंचा भाजपावर निशाणा
टेक्सटाईल पार्क, तीन लाख लोकांना रोजगार; पंतप्रधानांकडून मोठे गिफ्ट