अंपायरशी भांडण विराटला भोवलं, BCCI ने सुनावली ही शिक्षा

इंडियन प्रीमियर लीग २०२४ स्पर्धेत ३६ व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने रॉयल(virat kolhli) चॅलेंजर्स बेंगळुरू संघावर १ धावेने रोमांचक विजय मिळवला होता. दरम्यान, रविवारी (२१ एप्रिल) ईडन गार्डन्सवर झालेल्या या सामन्यात विराट कोहलीचे त्याची विकेट ज्या चेंडूवर गेली, त्या चेंडूवरून मैदानावरील पंचांशी वाद झाल्याचे पहायला मिळाले होते.

यानंतर आता अनेक मीडिया रिपोर्ट्सनुसार त्याच्यावर नियमांचे उल्लंघन केल्याने बीसीसीआयने कारवाई(virat kolhli) केली आहे. त्याला बीसीसीआयने सामना शुल्काच्या ५० टक्के दंड ठोठावला आहे.

बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार त्याने आयपीएलच्या आचार संहितेतील कलम 2.8 च्या अंतर्गत लेव्हल 1 ची चूक केली आहे. त्यामुळे त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली असून त्याने ही चूक मान्य केली आणि कारवाईही मान्य केली आहे. या सामन्यात कोलकाताने दिलेल्या २२३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीला उतरलेल्या विराटला तिसऱ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर हर्षित राणाने बाद केले. त्याने टाकलेल्या फुलटॉसवर त्यानेच झेल घेतला होता.

मात्र, विराटच्या म्हणण्यानुसार हा चेंडू त्याच्या कंबरेच्या वर होता त्यामुळे नो-बॉल होता. त्यामुळे त्याने रिव्ह्यु घेतला.यावेळी थर्ड अंपायर मायकल गॉफ यांच्या मते तो चेंडू विराटच्या कंबरेच्या खाली होता.

तसेच रिव्ह्युमध्ये बॉल ट्रॅकिंगमध्येही असे दिसले की जर विराट क्रिजमध्ये उभा असता, तर तो चेंडू त्याच्या कंबरेच्या खाली असता. त्यामुळे हा चेंडू वैध ठरवण्यात आला. या घटनेनंतर विराट पॅव्हेलियनमध्ये परत जाताना चिडला होता. यावेळी त्याचे मैदानावरील पंचांबरोबरही भांडण झाले होते.

विराटने या सामन्यात 7 चेंडूत 1 चौकार आणि 2 षटकारांसह 18 धावा केल्या होत्या. तसेच बेंगळुरूकडून विल जॅक्स (55) आणि रजत पाटीदार (52) यांनी अर्धशतके केली होती. अखेरीच्या षटकात कर्ण शर्माने 3 षटकार मारून बेंगळुरूला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. परंतु, बेंगळुरूला विजयासाठी 2 धावा, तर बरोबरीसाठी 1 धाव कमी पडली. कोलकाताकडून गोलंदाजीत आंद्र रसेलने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.

तत्पुर्वी, कोलकाताकडून प्रथम फलंदाजी करताना कर्णधार श्रेयस अय्यरने 24 धावांची खेळी केली. तसेच फिल सॉल्टने 48 धावांची खेळी केली. तर रिंकू सिंग (24), आंद्र रसेल (27) आणि रमनदीप सिंग (24) यांनी छोटेखानी, पण महत्त्वपूर्ण खेळी केल्या. बेंगळुरूकडून गोलंदाजीत यश दयाल आणि कॅमेरॉन ग्रीन यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

हेही वाचा :

निवडणुकीला राहून चूक केली, शाहू महाराजांचा पराभव नक्की होणार : हसन मुश्रीफ

विशाल पाटलांचं ठरलं, आता माघार नाहीच..! ‘या’ चिन्हावर लढणार तर शेट्टींना पुन्हा…

सतेज पाटलांचा मंडलिकांना इशारा; शाहू महाराजांवर व्यक्तिगत टीकेचे धाडस करू नका…