BCCI च्या निर्णयामुळे मुंबई इंडियन्सच्या अडचणी वाढल्या

इंडियन प्रीमियर लीगही(Mumbai Indians) जगातील सर्वात मोठ्या लीगपैकी एक असून याचा 18 वा सीजन येत्या काही महिन्याचं सुरु होणार आहे. मात्र यापूर्वी नव्या सीजनसाठी मेगा ऑक्शन पार पडणार असून यात फ्रेंचायझींना त्यांच्या संघाची नव्याने बांधणी करता येणार आहे. आयपीएल 2025 मेगा ऑक्शनपूर्वी खेळाडूंना रिटेन करण्याबाबत नवी अपडेट समोर आली आहे. जर बीसीसीआयने या रिटेन्शन नियमावर शिक्कामोर्तब केला तर मुंबई इंडियन्सच्या अडचणी वाढू शकतात.

सामान्यपणे दर 5 वर्षांनी आयपीएलमध्ये मेगा ऑक्शन पार पडतं. यंदा 2024 च्या अखेरीस आयपीएल 2025 साठी मेगा ऑक्शन होणार असून यापूर्वी झालेल्या मेगा ऑक्शनमध्ये प्रत्येक टीमला त्यांचे 4 खेळाडू रिटेन करण्याची सवलत दिली जायची. यात टीमला 4 पैकी 3 भारतीय आणि एक विदेशी खेळाडू तर 2 भारतीय आणि 2 विदेशी खेळाडू रिटेन करता यायचे. मात्र आता समोर येत असलेल्या रिपोर्ट्समध्ये करण्यात आलेल्या दाव्यानुसार यंदा बीसीसीआय प्रत्येक फ्रेंचायझीला प्रत्येकी 5 खेळाडू रिटेन करण्याची परवानगी देऊ शकते. ज्यात 3 भारतीय आणि 2 विदेश खेळाडूंचा समावेश असेल.

समोर येत असलेल्या रिपोर्ट्सनुसार जर बीसीसीआय खरोखरच आयपीएल 2025 साठी प्रत्येक फ्रेंचायझीला केवळ 3 भारतीय खेळाडू रिटेन करण्याची परवानगी देते तर मुंबई इंडियन्स मोठ्या अडचणीत सापडू शकते. रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह आणि सूर्यकुमार यादव हे चौघे मुंबई इंडियन्सचे स्टार खेळाडू आहेत. परंतु मेगा ऑक्शनपूर्वी केवळ 3 भारतीय खेळाडूंना रिटेन करण्याचा नियम आला तर मुंबई इंडियन्सला त्यांच्या एका स्टार खेळाडूला रिलीज करावं लागेल.

आयपीएल 2024 पूर्वी मुंबई इंडियन्सने(Mumbai Indians) गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याला ट्रेड करून आपल्या टीममध्ये घेतले होते. तर रोहित शर्मा ऐवजी हार्दिक पंड्याकडे कर्णधार पदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. परंतु या सीजनमध्ये टीमचा परफॉर्मन्स खूप खराब होता त्यामुळे पॉईंट टेबलमध्ये सुद्धा टीम खालच्या क्रमांकावर राहिली. रोहित शर्मा हा मुंबईचा स्टार फलंदाज असून त्याने गेल्या सीजनमध्ये शतक ठोकले होते तसेच त्याच्या नेतृत्वात टीमने तब्बल 5 वेळा विजेतेपद सुद्धा जिंकले. सूर्यकुमार यादव हा फलंदाजीत तर जसप्रीत बुमराह गोलंदाजीत मुंबई इंडियन्सचे हुकमी एक्के आहेत. परंतू आयपीएल 2025 पूर्वी या 4 स्टार खेळाडूंपैकी कोणा एकाची टीम बदलू शकते.

मीडिया रिपोर्ट्सनुसार स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव याला कोलकाता नाइट राइडर्स कर्णधारपदाची ऑफर दिली आहे. केकेआरने गेल्यावर्षी श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात आयपीएल 2024 चे विजेतेपद जिंकले होते. मात्र यंदा फ्रेंचायझी श्रेयसला कर्णधारपदावरून बाजूला करण्याचा विचार करत आहे. गौतम गंभीर टीम इंडियाचा हेड कोच झाल्यावर सूर्यकुमार यादव टी 20 फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचा कर्णधार झाला आहे. सूर्याने त्याच्या नेतृत्वात श्रीलंकेविरुद्ध झालेली टी 20 सीरिज सुद्धा जिंकली होती. मात्र केकेआरमध्ये जाण्याबाबत सूर्याने अद्याप अधिकृतपणे कोणतीही माहिती दिलेली नाही.

हेही वाचा:

हसन मुश्रीफांच्या XXXखोर वक्तव्यावर समरजितसिंह घाटगेंचा नाव न घेता हल्लाबोल

‘येक नंबर’ चित्रपटात दिसणार राज ठाकरे? चित्रपटाचा ट्रेलर पाहिला का?

‘मागितलं असतं तर सगळं दिलं असतं, पक्ष तोडण्याची गरज नव्हती…’ , सुप्रिया सुळेंचं मोठं वक्तव्य