सावध राहा! नाहीतर ते फोटो व्हायरल करेन; सतेज पाटलांचा संजय मंडलिक यांना इशारा

कोल्हापूर : मी संजय मंडलिक यांना सातत्याने(define otherwise) सांगत आहे, गादीवर बोलू नका. बंटी पाटलावर बोला काही अडचण नाही. तुम्हाला उत्तर द्यायला हा पाटील खंबीर आहे. शाहू महाराजांचा सन्मान राखा तुम्ही सावध राहा. नाहीतर ते फोटो व्हायरल करेन, असा इशारा सतेज पाटील यांनी खासदार संजय मंडलिक यांना दिलाय.

राज्यातील महत्त्वाच्या लोकसभा(define otherwise) निवडणुकीपैकी एक असेलल्या कोल्हापूरच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागलेय. कोल्हापूमध्ये शाहू महाराज हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. शाहू महाराज आणि खासदार संजय मंडलिक थेट लढत होणार आहे. मंडलिक यांनी आपल्या प्रचारसभेत थेट शाहू महाराज यांच्यावर टीका केली होती. मंडलिक यांच्या टीकेला सतेज पाटील यांनी उत्तर दिलं असून त्यांना इशारा दिलाय. काही दिवसापूर्वी संजय मंडलिक यांनी शाहू महाराज यांच्यावर टीका केली होती. त्यावरून सतेज पाटील यांनी त्यांना त्यांचे फोटो व्हायरल करण्याचा इशारा दिलाय.

कोल्हापूरच्या गादी बद्दल काही लोकप्रश्न करत आहेत. मी संजय मंडलिक यांना सातत्याने सांगत आहे, गादीवर बोलू नका. बंटी पाटलावर बोला काही अडचण नाही. तुम्हाला उत्तर द्यायला हा पाटील खंबीर आहे. शाहू महाराजांचा सन्मान राखा तुम्ही सावध राहा. ज्यावेळी २०१९ ला निवडणुकीला उभा होता त्यावेळी महाराजांच्या पाया पडायला गेला होता. महाराजांच्या पाया पडतानाचे फोटो माझ्याकडे आहेत, ते फोटो व्हायरल करेन, मग अडचण होईल त्यामुळे सन्मान राखा असा सल्ला सतेज पाटील यांनी दिलाय.

पाटील यांनी संजय मंडलिक यांना पराभूत करू असा दावा आपल्या इशाऱ्यातून केलाय. आमच्यावर बोला. आम्ही राजकारणात कसलेले पैलवान आहोत. शाडू मारून मैदानात उतरलोय पुढच्याला कुणाला घाबरत नाही. माती एकदा अंगावर घेतली तर पुढच्याला चितपट केल्याशिवाय गप्प बसणार नाही, असं पाटील म्हणालेत.

हेही वाचा :

महाराष्ट्रात उद्या किती मतदारसंघात मतदान? कुठल्या भागात शाळा-कॉलेजेस बंद?

“ती सभा, ती गर्दी…”; सध्याच्या राजकीय परिस्थितीवर संकर्षण कऱ्हाडेची खास कविता

बंडखोर विशाल पाटलांवर कारवाई होणार की नाही? काँग्रेस नेते म्हणाले तरी काय??