धकाधकीच्या जीवनशैलीत आणि स्क्रीनच्या अतिवापरामुळे(health) झोपेची वेळ कमी होते. सात तासांपेक्षा कमी झोप घेतल्यास आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो, आजारांची शक्यता वाढते.

झोप ही फक्त विश्रांती नव्हे, तर शरीर व मेंदूच्या आरोग्यासाठी आवश्यक(health) असलेली एक गुंतागुंतीची जैविक प्रक्रिया आहे. ती शरीराची दुरुस्ती, मेंदूचा पुनरविचार आणि मानसिक स्वास्थ्यासाठी अत्यावश्यक असते. तज्ज्ञ सांगतात की प्रत्येक प्रौढाने दररोज किमान ७ ते ८ तासांची शांत, अविरत व दर्जेदार झोप घेणे आरोग्यासाठी अत्यंत गरजेचे आहे.
९०% लोक चुकीच्या पद्धतीने चेहरा धुतात, चेहरा धुण्यामुळे होणाऱ्या त्वचेच्या समस्या टाळा ‘या’ स्टेप्स फॉलो करा
आजच्या धकाधकीच्या जीवनात सततचा ताणतणाव(health) आणि मोबाइल-स्क्रीनचा अतिरेकी वापर यामुळे अनेकजण झोपेस प्राधान्य देत नाहीत. सात तासांपेक्षा कमी झोपेमुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. झोपेअभावी एकाग्रतेत घट, मूडमध्ये चढ-उतार, रोगप्रतिकारशक्ती कमी होणे आणि हृदयविकाराचा धोका वाढतो. या लेखात, अपुरी झोप कोणते आजार वाढवते आणि ती कशी टाळावी हे पाहूया.
डिजिटल आय स्ट्रेन म्हणजे काय? स्क्रीनमुळे होणाऱ्या डोळ्यांच्या ताणापासून बचावाचे सोपे उपाय
हृदयरोगाचा धोका
अपुरी झोप शरीरातील कॉर्टिसोलचे प्रमाण वाढवते, ज्यामुळे धमन्यांमध्ये जळजळ होऊन हृदयरोग आणि स्ट्रोकचा धोका वाढतो. यासोबतच रक्तदाब आणि कोलेस्टेरॉलची पातळीही वाढते. त्यामुळे तज्ज्ञ सातत्याने दररोज किमान ७ तासांची शांत झोप घेण्याचा सल्ला देतात, जे आरोग्यासाठी अत्यंत गरजेचे आहे.’एकटेपणा’ हा आजार असू शकतो का? मानसिक व शारीरिक आरोग्यासाठी धोकादायक आजार
मधुमेहाचा धोका
अपुरे झोप घेतल्यास इन्सुलिनची कार्यक्षमता कमी होते, ज्यामुळे टाइप-२ मधुमेहाचा धोका वाढतो. झोपेची कमतरता साखरेची पातळी अस्थिर करते. त्यामुळे नियमित ७-८ तासांची झोप, हलका व्यायाम, संतुलित आहार, कोमट पाणी किंवा हर्बल टीचे सेवन आणि रात्री हलके जेवण आवश्यक आहे.
मानसिक आरोग्यावर परिणाम
झोपेची कमतरता मेंदूच्या भावनांवर नियंत्रण ठेवणाऱ्या प्रीफ्रंटल कॉर्टेक्सवर परिणाम करते, ज्यामुळे चिंता, नैराश्य व ताण वाढतो. यामुळे एकाग्रता व स्मरणशक्ती कमी होते. रोज ठरलेल्या वेळेला झोप आणि उठणे, तसेच झोपण्यापूर्वी स्क्रीनचा वापर टाळणे हे झोपेचे आरोग्य सुधारण्यास मदत करते.
कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती
अपुर्या झोपेमुळे रोगप्रतिकारक शक्ती कमजोर होते, ज्यामुळे सर्दी, फ्लू आणि संसर्गांचा धोका वाढतो. यामुळे घ्रेलिन संप्रेरक वाढून भूक लागते व लठ्ठपणा होतो. झोपेचे वेळापत्रक ठरवा, झोपण्यापूर्वी जड जेवण व कॅफिन टाळा आणि शांततेसाठी योग निद्रा वा श्वसनतंत्र वापरा.
हेही वाचा :
उबाठा सेनेत बेरजेचे नव्हे तर वजाबाकीचे राजकारण
सावधान! घरात मांजर पाळताय? संशोधनातून धक्कादायक माहिती उघड
चॉकलेटसाठी हट्ट केल्यावर जन्मदात्याने चार वर्षीय लेकीला संपवलं; पळून जात असतांना अटक…..