राज्यात पुढील काही दिवस पावसाचा(heavy rain) जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. कोकणात सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. या तिन्ही जिल्ह्यांमध्ये 16 जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
यासोबतच पालघर, ठाणे, मुंबईला पावसाचा(heavy rain) यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुणे, कोल्हापूर, साताराच्या घाट विभागात देखील जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या ठिकाणी देखील ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
विदर्भातील अनेक जिल्ह्यातही पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे येथील बहुतांश जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. दक्षिण गुजरात ते उत्तर केरळ किनारपट्टी लगत कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्याने आज पासून पुढील पाच दिवस कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
मराठवाड्यात देखील बऱ्याच भागात आज पावसाची शक्यता आहे. तसेच पुणे, कोल्हापूर, सातारा, जिल्ह्यातील घाट विभागात 24 तासात तुरळक ठिकाणी खूप जोरदार म्हणजेच 116 ते 204 मिलिमीटर पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथील नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.
यासोबतच जळगाव, पालघर, सिंधुदुर्ग आणि नाशिक, मुंबई, कोल्हापूर जिल्ह्यातील घाट विभागात 65 मिलिमीटर ते 115 मिलिमीटर पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
पुणे व शहर परिसरात पुढील चार दिवस आकाश सामान्यत: ढगाळ राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळतील. तर घाट विभागात 24 तासात काही ठिकाणी जोरदार पाऊस म्हणजेच 65 ते 115 मिलिमीटर पाऊस पडण्याची शक्यता आहे.
हेही वाचा :
नंबर 2 दूर नाही… भारत बनणार जागतिक महासत्ता, अमेरिकेला धोबीपछाड
”अरविंद केजरीवाल ‘कोमा’मध्ये जाऊ शकतात”, ‘आप’ नेत्याने केला दावा
”वाघनखं कोल्हापुरात आणली तर…” सुधीर मुनगंटीवारांच्या विरोधात आंदोलन