नाशिक : गेल्या काही दिवसांपासून राजकीय स्तरावर विविध घडामोडी(Assembly) घडत आहेत. त्यातच लोकसभा निवडणुकीवेळी ‘इंडिया’ आघाडीचा घटक पक्ष असलेल्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाने आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यात किमान 15 जागांची मागणी केली आहे. या जागांवर चर्चा करावी व पक्षाचा सन्मान करावा, अन्यथा निवडणुकीचा मार्ग मोकळा असल्याचा इशारा दिला आहे.
नाशिक येथे पक्षाच्या राज्य परिषदेच्या बैठकीत(Assembly) हा निर्णय घेण्यात आला. राष्ट्रीय सचिव भालचंद्र कानगो यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. नागपूर जिल्ह्यातील हिंगणा मतदारसंघाची मागणी केली आहे. येथून श्याम काळे यांना पक्ष निवडणूक रिंगणात उतरविणार असल्याचे ठरले. तर, वणी व पारनेर या दोन मतदारसंघाचाही भाकपचा आग्रह आहे. राज्यभर किमान 15 जागाही पक्षाने ठरविल्या आहेत. त्या मविआसोबत होणाऱ्या चर्चेवेळी सांगण्यात येणार आहे.
लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीचा घटक पक्ष असलेल्या भाकपने जोरदार प्रचार केला होता. पक्षाचे कार्यकतें मैदानात उतरल्याने याचा फायदा महाविकास आघाडीला राज्यात झाला. आता विधानसभा निवडणुकीत याची परतफेड करण्याची वेळ आली आहे. राज्यात मविआतील काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट व राष्ट्रवादी शरद पवार गटातच निवडणुकीतील जागावाटपाबाबत चर्चा होते. इतर छोट्या पक्षांना यात सामावून घेतले जात नाही, असा भाकपचा आरोप आहे.
दरम्यान, डाव्या आघाडीचा घटक असलेल्या भाकपचे देशात अस्तित्व आहे. राज्यातही मोठ्या संख्येत कामगार क्षेत्रात कार्यकतें आहेत. त्यामुळे भाकपला मविआत सन्मान मिळावा अशी अपेक्षा आहे.
हेही वाचा :
राजकारणातून होते आहे भाषा सभ्यता तडीपार!
थोडक्यात वाचला टीम इंडियाच्या खेळाडूचा डोळा! रक्तबंबाळ प्लेयरला पाहून गौतम झाला ‘गंभीर’ Video
आगामी निवडणुकीत तिसरी नाही, तर शेतकऱ्यांची आघाडी; बच्चू कडूंची मोठी घोषणा