मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता हा खात्यावर जमा (installment payment)करण्यात आला आहे. महायुती सरकारने रक्षाबंधन सणाच्या आधीच लाडक्या बहिणींना ही भेट दिली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे.
1 जुलैपासून ही योजना कार्यान्वित झाली असून आतापर्यंत(installment payment) तब्बल 1 कोटी 35 लाख अर्ज स्वीकारण्यात आले आहेत. तर, रक्षाबंधाच्या पार्श्वभूमीवर 17 ऑगस्ट रोजी हा निधी पात्र महिलांच्या खात्यात जमा होणार होता.
मात्र, महायुती सरकारने त्यापूर्वीच हप्त्याचे पैसे जमा केले आहेत. यामुळे महिलांना स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी मोठी खुशखबर मिळाली आहे. रक्षाबंधनाच्या पूर्वीच आणि स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येलाच काही पात्र महिलांच्या खात्यात पैसे पाठवण्यात आले आहेत.
महिलांना दोन महिन्याचे मिळून असे एकूण 3 हजार रुपये खात्यात जमा झाल्याचे संदेश आले आहेत. सरकारने मुदतीपूर्वीच पैसे खात्यात वर्ग केल्याने महिलांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. महिला बँकेत जाऊन याबाबत अधिक चौकशी करू शकतात.
दरम्यान, योजनेचे पैसे हे मोजक्याच महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. यावरूनही आता चर्चा रंगते आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या बँक खात्यात जमा होऊ लागल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मीडियाशी संवाद साधला.
“17 तारखेला पैसे ट्रान्स्फर करताना कोणत्याही अडचणी येऊ नयेत म्हणून आम्ही खबरदारी घेत आहोत. 17 तारखेला तांत्रिक अडचणीमुळे खात्यात पैसे गेले नाही तर तुम्हीच बोंब माराल. त्यामुळे आम्ही आजच हे पैसे पाठवायला सुरुवात केली आहे.”, असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.
हेही वाचा :
नववीच्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार आणि नंतर हत्या; समाजात खळबळ
अभिषेक बच्चनने ऐश्वर्या रायचं करिअर उद्ध्वस्त केलं? व्हायरल पोस्टमुळे खळबळ
स्वातंत्र्यदिन २०२४: पांढऱ्या कुर्ता-पायजामासह निळ्या जॅकेटमध्ये पंतप्रधान मोदींचा खास लूक