लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹२००० मिळणार मुंबई महापालिकेने आखला मास्टर प्लान?

राज्यात ‘लाडकी बहीण योजने’च्या माध्यमातून लाभार्थी महिलांना महिना १५०० रुपये दिले जात आहेत. राज्यात गेम चेंजर ठरलेली ही योजना आता मुंबई महापालिका देखील राबवण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिका ‘स्वाभिमानी निधी’ या योजनेच्या माध्यमातून घरकाम कामगार, स्वयंपाक करणाऱ्या अंसघिटत क्षेत्रातील महिला कामगारांना दरमहा १५०० ते २००० रुपये आर्थिक सहाय्य देण्याचा प्रस्ताव पालिकेकडून तयार करण्यात आलाय.

मीडिया रिपोर्टनुसार, प्रस्तावासाठी महापालिकेकडून राज्य सरकारकडे मंजुरी मागितली आहे. ‘स्वाभिमानी निधी’ योजनेमुळे पालिकेवर ७५ ते १०० कोटींचा अतिरिक्त आर्थिक भार पडण्याची शक्यता व्यक्त केली आहे. राज्य सरकारने २०२४ साली लाडकी बहीण योजने केली. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना दरमहा १५०० रुपये दिले जाताहेत. महागाई, वाढता घरखर्चामुळे महिलांना आर्थिक आधार देण्यासाठी ही योजना सुरू करण्याची पालिकेचा मानस आहे.(‘Ladki Bahin Yojana’) काही महिन्यांपूर्वी महानगरपालिकेच्या निवडणुकीत ठाकरे गटाने त्यांच्या जाहीरनाम्यात महिलांना आर्थिक सहाय्य देण्याचा उल्लेख केला होता. ठाकरे गटाच्या महिला नेत्या, विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी या संबंधित प्रस्ताव सभागृहनेते गणेश खणकर यांच्याकडे पाठवला. त्यांनंतर खणकर यांनीही प्रस्तावाला पाठिंबा दर्शवला. (‘Ladki Bahin Yojana’) त्यानंतर त्यांनी प्रशासनाला व्यवहार्यता तपासण्यास सांगितलं आहे.

आजारपण, वृद्धत्व किंवा आर्थिक संकटात महिलांना आर्थिक आधार देण्याची गरज असल्याचे प्रस्तावात म्हटलं आहे. या प्रस्तावात या योजनेस ‘स्वाभिमानी निधी’ असे नाव देण्यात आलंय. हा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यात आलाय. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास लाभार्थ्यांची नोंदणी केली जाईल. त्यानंतर पडताळणी प्रक्रिया देखील सुरू केली जाईल. (‘Ladki Bahin Yojana’) यासाठी पालिकेच्या २६ विभाग कार्यालयांमार्फत सर्वेक्षण केले जाईल.तत्पूर्वी, या योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-श्रम पोर्टलवरील नोंदणी ही पात्रतेसाठी महत्वाची अट असण्याची शक्यता आहे. गृहनिर्माण संस्था, स्वयंसेवी संस्था आणि बचत गटाच्या माध्यमांतून पडताळणी केली जाण्याची शक्यता आहे. मुंबईत सुमारे पाच लाख घरकामगार महिला आहेत, असा संघटनेचा अंदाज आहे. यासाठी पालिकेला दरमहा ७५ ते १०० कोटी रुपये खर्च करावे लागू शकतात. त्यामुळे पालिकेच्या खर्चावर आर्थिक ताण येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा :

आंबे खाल्ल्यानंतर दोन बहीणींचा मृत्यू

NEET 2026 विद्यार्थ्यांना सर्वात मोठा दिलासा!

सोने-चांदी महागलं! वाचा आजचे ताजे दर